पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. देउबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी झालेली नेमणूक तसेच संसदेत विश्वासमत जिंकल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले.
भारत आणि नेपाळ यांच्यामधील विशेष संबंध तसेच शतकानुशतके उभय देशांतील नागरिकांमध्ये असलेले परस्पर संबंध त्यामुळे दोन्ही देशांमध्ये जी विशेष मैत्री आहे त्याचे स्मरण दोन्ही नेत्यांनी केले आणि सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याने काम करण्यावर सहमती व्यक्त केली.
हेच सहकार्याचे बंध दृढ करण्याबाबत तसेच सध्या कोविड-19 महामारी विरुद्ध चाललेला लढ्याच्या संदर्भात सहकार्याने काम करण्याबाबत त्यांनी विशेषत्वाने चर्चा केली.