पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या महामहीम युन सुक –येउल यांच्याशी आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी युन यांचे अभिनंदन केले.
भारत-कोरिया धोरणात्मक भागीदारी, विशेषकरून सध्याच्या जागतिक परिस्थितीत ही भागीदारी अधिक विस्तृत आणि घनिष्ठ करण्याच्या महत्वावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. द्विपक्षीय सहकार्याला अधिक वेग देणाऱ्या संभाव्य विविध क्षेत्रावर उभय नेत्यांनी चर्चा केली आणि या दिशेने एकत्र काम करण्यालाही संमती दर्शवली.
भारत आणि रिपब्लिक ऑफ कोरिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधाना पुढच्या वर्षी 50 वर्षे होत असल्याबद्दल संयुक्तपणे वर्धापनदिन साजरा करण्याच्या इच्छेवर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी, युन यांना, त्यांच्या सोयीनुसार भारताला भेट देण्यासाठी निमंत्रण दिले.