पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड येथे नमामी गंगे योजनेअंतर्गत सहा मेगा प्रकल्पांचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.
68 एमएलडी एसटीपी प्रकल्पाचे बांधकाम, हरिद्वारमधील जगजीतपूर येथील 27 एमएलडी प्रकल्पांचे अद्ययावतीकरण, सराई हरिद्वार येथील 18 एमएलडी एसटीपी प्रकल्पांचे बांधकाम या प्रकल्पांचा यात समावेश आहे. जगजीतपूर येथील 68 एमएलडी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, हा हायब्रीड वार्षिकी पीपीपी माध्यमातून उभारलेला पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे.
ह्रषिकेश येथील लक्कडघाट 26 एमएलडी एसटीपी प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. 80% सांडपाणी हरिद्वार-ह्रषिकेश विभागातून गंगा नदीत जाते. म्हणून, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी या एसटीपी प्रकल्पांचे उद्घाटन महत्त्वाचे आहे.
मुनी की रेती गावातील चंद्रेश्वर नगर येथील 7.5 एमएलडी एसटीपी प्रकल्प हा देशातील पहिलाच चार मजली प्रकल्प आहे, या ठिकाणी जागेच्या कमतरतेचे संधीत रुपांतर केले आहे. एसटीपी प्रकल्प 900 चौरस मीटर जागेत निर्माण केला आहे, जी नियमित एसटीपी प्रकल्पापेक्षा 30% कमी जागा आहे.
पंतप्रधान चोरपानी येथील 5 एमएलडी एसटी प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत तसेच बद्रीनाथ येथील 1 एमएलडी आणि 0.01 एमएलडी या दोन प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
उत्तराखंडमधील गंगा नदीजवळील 17 शहरांतील प्रदुषणावर उपाय म्हणून हाती घेण्यात आलेले सर्व 30 प्रकल्प (100%) पूर्ण झाले आहेत. ही एक मोठी उपलब्धी आहे.
पंतप्रधान गंगा नदीवरील संस्कृती, जैवविविधता आणि पुनरुज्जीवन उपक्रम दर्शविण्यासाठी गंगेवरील पहिले संग्रहालय "गंगा अवलोकन" चेही उद्घाटन करणार आहेत. हरिद्वार येथील चांदी घाट येथे हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.
नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा अँड वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने प्रकाशित झालेल्या ‘रोईंग डाउन दी गँजेज’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे. हे आकर्षक पुस्तक गंगा नदीच्या जैवविविधता आणि संस्कृतीचा मिलाफ करण्याचा प्रयत्न आहे. गंगा नदीच्या कथेची संकल्पना अशी आहे की जेंव्हा कोणी गोमुखपासून उगम पावणारी नदी पासून प्रवास सुरु करतो तेंव्हा समुद्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शेवटचा बिंदू गंगा सागरकडे जाताना एखाद्याला काय दिसेल.
जल जीवन मिशन लोगो व ‘जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पंचायत आणि पाणी समिती’ साठी मार्गदर्शिका यांचेही अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रम पाहण्यासाठीचे संकेतस्थळ: https://pmevents.ncog.gov.in/