77व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आम्ही जी-20 शिखर परिषदेसाठी ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना मांडली आणि या दिशेने काम करत आहोत. जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आहे आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला आहे.
We paved the way to fight climate change by launching Mission #LiFE-'Lifestyle for the Environment' and made International Solar Alliance and many countries have become part of it: PM @narendramodi#IndependenceDay #NewIndia#IndependenceDay2023 #RedFort pic.twitter.com/gmileuidZ4
— PIB India (@PIB_India) August 15, 2023
पंतप्रधान म्हणाले की आम्ही जगासोबत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार केली आणि आता अनेक देश या आघाडीचा भाग बनले आहेत. आम्ही जैवविविधतेवर भर दिला आहे आणि बिग कॅट आघाडी स्थापन केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जनशक्ति और जलशक्ति से पर्यावरण कल्याण !#IndependenceDay pic.twitter.com/3h0sWKXnRv
— Bhupender Yadav (@byadavbjp) August 15, 2023