QuoteLord Jagannath embodies social justice and harmony: PM Modi during #MannKiBaat
Quote#MannKiBaat: India’s diversity is her strength, says Prime Minister Modi
QuoteCleanliness is no longer a government’s programme. It has become a ‘Jan Andolan’ today: PM Modi #MannKiBaat
QuoteEmergency in 1975 was the darkest night for our democracy: Prime Minister Modi during #MannKiBaat
QuoteAll our efforts must to be to make the democratic fabric stronger, says the Prime Minister during #MannKiBaat
Quote#MannKiBaat: PM Modi says yoga has integrated the entire world
QuoteCompletion of 1000 days for Mars Mission is a milestone in exploring the space: PM Modi during #MannKiBaat
QuotePM Modi during #MannKiBaat: Sports develop a sportsman spirit within an individual. It enhances overall personality 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ऋतूपालट होत आहे. यावर्षी उन्हाळा देखील खूप तीव्र होता. मात्र, बरं झालं, मौसमी पाऊस वेळेवर दाखल झाला आणि  त्याची पुढील वाटचाल सुरळीत सुरु आहे. देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे आल्हाददायक वातावरण आहे. पावसांनंतर गार वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसातल्या उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला आहे. आणि आपण सर्वानी पाहिलं आहे कि, आयुष्यात कितीही धावपळ असो, कितीही तणाव असो, वैयक्तिक जीवन असो, सार्वजनिक जीवन असो, पावसाचं आगमन आपली मनःस्थिती बदलवून टाकतं.

भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज  देशातल्या अनेक भागांमध्ये खूपच श्रद्धापूर्वक आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आतातर जगातल्या काही भागांमध्येही भगवान जगन्नाथाच्या  रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो.  भगवान जगन्नाथजी यांच्याशी देशातला गरीब जोडलेला आहे.  ज्या लोकांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी पाहिलं असेल कि भगवान जगन्नाथजी यांचं मंदिर आणि त्यांच्या परंपरांची ते खूप प्रशंसा करायचे, कारण त्यामध्ये सामाजिक न्याय, सामाजिक  समरसता अंतर्निहित होते. भगवान जगन्नाथ गरीबांचे दैवत आहे  हे  खूप कमी लोकांना माहित असेल , इंग्रजीत एक शब्द आहे जगरनॉट, आणि त्याचा अर्थ आहे, एक असा भव्य रथ जो कुणीही अडवू शकत नाही  आणि या जगरनॉटच्या शब्दकोशातील अर्थात देखील असं आढळून येतं कि जगन्नाथाच्या रथाबरोबरच या शब्दाची उत्पत्ती झाली आहे आणि म्हणूनच आपण समजू शकतो कि जगानं देखील जगन्नाथाच्या या यात्रेला आपापल्या पद्धतीनं कशा प्रकारे याचं महत्व स्वीकारलं आहे. भगवान जगन्नाथजी यांच्या यात्रेनिमित्त मी सर्व देशबांधवांना शुभेच्छा देतो. आणि भगवान जगन्नाथ यांच्या श्रीचरणी वंदनही करतो.

भारताचं वैविध्य हे त्याचं वैशिष्ट्य देखील आहे, भारताचं वैविध्य ही भारताची ताकद देखील आहे. रमजानचा पवित्र महिना सर्वदूर श्रद्धेनं पवित्र भावनेसह साजरा करण्यात आला. आता ईदचा सण आहे. ईद-उल-फितरह निमित्त माझ्याकडून सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. रमजान महिना पुण्य दान करण्याचा महिना आहे., आनंद वाटण्याचा महिना आहे आणि जेवढा आनंद वाटाल तेवढाच आनंदही वाढतो. चला, आपण  सर्वानी मिळून, या पवित्र सणांपासून प्रेरणा घेऊन आनंदाचा खजिना वाटत जाऊ या, देशाला पुढे नेऊ  या. रमजानच्या या पवित्र महिन्यात उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील मुबारकपूर गावाची अतिशय प्रेरक घटना माझ्यासमोर आली. आपल्या सुमारे साडे तीन हजार मुसलमान बंधू-भगिनींची कुटुंबं त्या छोट्याशा गावात राहतात, एक प्रकारे, आपल्या मुस्लिम  कुटुंबांतील  बंधू-भगिनींची लोकसंख्या तिथे जास्त आहे. या रमजानच्या काळात गावकऱ्यांनी एकत्रितपणे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

 या वैयक्तिक शौचालयासाठी  सरकारकडूनही सहाय्य्यता मिळते आणि या सहाय्यांतर्गत अंदाजे १७ लाख रुपये त्यांना देण्यात आले. तुम्हाला ऐकून सुखद आश्चर्यही वाटेल, आनंद होईल. रमजानच्या या पवित्र महिन्यात तिथल्या आपल्या सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी सरकारकडे ते १७ लाख रुपये परत केले. आणि असं सांगितलं कि आम्ही आमचं शौचालय आमच्या मेहनतीने, आमच्या पैशानी बांधू. हे १७ लाख रुपये तुम्ही गावातल्या अन्य सुविधांसाठी खर्च करा. या पवित्र दिनाचं समाजाच्या कल्याणाच्या संधीत रूपांतर केल्याबद्दल मी मुबारकपूरच्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो. त्यांची एक-एक गोष्ट देखील खूप प्रेरणादायी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुबारकपूरला हागणदारी मुक्त केलं. आपल्याला माहित आहे कि आपल्या देशात सिक्कीम, हिमाचल आणि केरळ हे तीन प्रदेश यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. या आठवड्यात उत्तराखंड आणि हरियाणा देखील हागणदारीमुक्त घोषित होतील. मी या पाच राज्यांच्या प्रशासनाचे, सरकारचे आणि जनतेचे हे कार्य पूर्ण केल्याबद्दल विशेष आभार मानतो .

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात, समाजाच्या जीवनात काही चांगलं करायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते हे आपण सगळेच जाणतो. जर आपलं हस्ताक्षर खराब आहे, आणि ते सुधारायचं आहे, तर बराच काळ अतिशय जागरूक राहून प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे शरीराच्या, मनाच्या ते अंगवळणी पडतं. स्वच्छतेचा विषयही असाच आहे. या वाईट सवयी आपल्या स्वभावाचा भाग बनल्या आहेत. आपल्या सवयींचा भाग बनल्या आहेत. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला नियमितपणे प्रयत्न करावेच लागतील. प्रत्येकाचं लक्ष वेधून घ्यावंच लागेल. चांगल्या प्रेरणादायी घटनांचं पुन्हा-पुन्हा स्मरण करावंच लागेल. आणि मला आनंद वाटतो कि, आता  स्वच्छता हा सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही. ती समाजाची, सामान्य माणसाची चळवळ बनत चालली आहे. आणि सरकारमध्ये बसलेले लोक देखील लोकसहभागातून हे कार्य पुढे नेतात, तेव्हा त्याची ताकद कित्येक पटीनं वाढते.

अलिकडेच एक अतिशय उत्तम घटना माझ्या ध्यानात आली, जी मी तुम्हाला अवश्य सांगू इच्छितो. हि घटना आहे आंध्र प्रदेशातल्या विजयनगरम  जिल्ह्यातील. तिथल्या प्रशासनाने लोकसहभागातून एक मोठं काम हाती घेतलं. १० मार्चला सकाळी ६ वाजल्यापासून १४ मार्चला सकाळी १० वाजेपर्यंत. १०० तासांचं अथक अभियान. आणि उद्दिष्ट काय होत ?  १०० तासांमध्ये ७१ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार घरांमध्ये शौचालये बांधणं. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल कि जनतेनं आणि प्रशासनानं मिळून १०० तासांमध्ये १० हजार शौचालये बांधण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं. ७१ गावं हागणदारीमुक्त झाली. मी सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं, सरकारी अधिकाऱ्यांचं आणि विजयनगरम जिल्ह्यातल्या त्या गावच्या नागरिकांचं खूप-खूप अभिनंदन करतो, त्यांनी अथक परिश्रमांनी एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे.

गेले काही दिवस 'मन कि बात' साठी जनतेकडून नियमितपणे सूचना येत असतात, NarendraModiApp  वर येतात,  MyGov.in वर येतात. पत्रांच्या माध्यमातून येतात, आकाशवाणीकडे येतात.

श्रीयुत प्रकाश त्रिपाठी यांनी आणीबाणीची आठवण काढताना लिहिलं आहे कि २५ जून हा लोकशाहीच्या इतिहासातला  एक काळा कालखंड  आहे. प्रकाश त्रिपाठी यांची लोकशाही प्रति हि जागरूकता कौतुकास्पद आहे. आणि लोकशाही हि एक व्यवस्था आहे असं नाही तर तो एक संस्कार देखील आहे. अंतर्मनातील सजगता हि मुक्तीची किंमत आहे. लोकशाहीप्रती नियमित जागरूकता आवश्यक असते आणि म्हणूनच लोकशाहीवर आघात करणाऱ्या बाबींचेही स्मरण करायचं असतं आणि लोकशाहीच्या चांगल्या बाबींच्या दिशेनं पुढे मार्गक्रमण करायचं असतं. १९७५-२५ जून ती अशी काळरात्र होती, जी कोणताही लोकशाही प्रेमी विसरू शकणार नाही. कोणताही भारतवासी विसरू शकणार नाही. एक प्रकारे देशाचं रूपांतर तुरुंगांमध्ये करण्यात आलं होतं.

विरोधी सूर दाबण्यात आला होता. जयप्रकाश नारायण यांच्यासह देशातल्या गणमान्य नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होत. न्यायव्यवस्था देखील संकटकाळाच्या त्या भयावह सावलीपासून वाचू शकली नव्हती.  वृत्तपत्रांना तर पूर्णपणे बेरोजगार बनवण्यात आलं होतं. आजचे पत्रकारिता जगातले विद्यार्थी, लोकशाहीत काम करणारे लोक त्या काळ्या कालखंडाचा वारंवार स्मरण करून लोकशाहीप्रती जागरूकता वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत आणि करत राहायला हवं. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी देखील तुरुंगात होते. जेव्हा आणीबाणीला एक वर्ष पूर्ण झालं, तेव्हा अटलजींनी एक कविता लिहिली होती आणि त्यांनी त्यावेळच्या मनस्थितीचं वर्णन आपल्या कवितेत केले आहे.

झुलसाता जेठ मास,

शरद चाँदनी उदास,

झुलसाता जेठ मास,

शरद चाँदनी उदास,

सिसकी भरते सावन का,

अंतर्घट रीत गया,

एक बरस बीत गया,

एक बरस बीत गया ||

सीखचों में सिमटा जग,

किंतु विकल प्राण विहग,

सीखचों में सिमटा जग,

किंतु विकल प्राण विहग,

धरती से अम्बर तक,

धरती से अम्बर तक,

गूंज मुक्ति गीत गया,

एक बरस बीत गया,

एक बरस बीत गया ||

पथ निहारते नयन,

गिनते दिन पल-छिन,

पथ निहारते नयन,

गिनते दिन पल-छिन,

लौट कभी आएगा,

लौट कभी आएगा,

मन का जो मीत गया,

एक बरस बीत गया ||

लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांनी मोठी लढाई लढली आणि भारतासारखा देश, एवढा मोठा विशाल देश, जेव्हा संधी मिळाली तेव्हा भारताच्या जनतेच्या नसानसात लोकशाही कशी भिनली आहे, त्या ताकदीचे दर्शन निवडणुकांच्या माध्यमातून घडवलं. जनतेच्या नसानसात भिनलेली लोकशाहीची ही भावना आपला अमर ठेवा आहे. हा वारसा आपल्याला अधिक सशक्त करायचा आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, प्रत्येक भारतीयाची मान  आज जगात अभिमानानं उंचावली आहे. २१ जून २०१७- संपूर्ण जग योगमय झालं होतं. समुद्रापासून पर्वतापर्यंत लोकांनी सकाळी-सकाळी सूर्याच्या किरणांचं स्वागत योगच्या माध्यमातून केलं. असं कुठला भारतीय असेल ज्याला याचा अभिमान वाटला नसेल. असं नाही कि पूर्वी योगाभ्यास नव्हता, मात्र आज जेव्हा योगच्या धाग्यात बांधले गेले आहोत, योग जगाला जोडण्याचं कारण बनला आहे. जगातील बहुतांश सर्व देशांनी योगची हि संधी आपली संधी बनवली. चीनमधील ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’  इथं लोकांनी योगाभ्यास केला, तर पेरू इथं माचू-पिच्चू या जागतिक वारसा स्थळी समुद्र सपाटी पासून २४०० मीटर उंचीवर लोकांनी योगासने केली. फ्रान्समध्ये आयफेल टॉवरच्या छायेत लोकांनी योगाभ्यास केला. यूएई मध्ये अबुधाबी इथं ४ हजारांहून अधिक लोकांनी सामूहिक योगाभ्यास केला.

संयुक्त अरब एमिरात येथील अबुधाबी मध्ये जवळपास ४००० पेक्षा अधिक लोकांनी सामूहिक योगाभ्यास केला. अफगाणिस्तान मध्ये, हेरत येथे , भारत अफगाण मैत्री डॅम अर्थात सलमा बांध वर योगाभ्यास करून भारताच्या मैत्रीला एक वेगळा आयाम दिला. सिंगापूर सारख्या छोट्या शहरात  ७०स्थानावर कार्यक्रम   घेण्यात आलीत .  त्यांनी आठवडाभर तेथे अभियान  चालवले. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग्य दिवसा निमित्त १० पोस्टल सेवा स्टॅम्प्स काढलेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग मास्तरांबरोबर  योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी, जगातील प्रथित यश राजतज्ञ  या मध्ये समाविष्ट झाले होते.

यावर्षीही पुन्हा एकदा योगाने जागतिक विक्रम नोंदवण्याचं काम केलं. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं जवळपास ५५ हजार लोकांनी एकाच वेळी योगासने करून एक नवीन जागतिक विक्रम नोंदवला. मलाही लखनौ इथं योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि  पहिल्यांदाच मला पावसात योगासने करण्याचं सौभाग्य लाभलं. आपल्या जवानांनी जिथे उणे २०, २५, ४० अंश तापमान असतं  त्या सियाचीन मधेही योगाभ्यास केला. आपले सशस्त्र दल असेल, सीमा सुरक्षा दल असेल, आयटीबीपी असेल, सीआरपीएफ असेल, प्रत्येकाने आपल्या कामाबरोबर योगासनांना आपला हिस्सा बनवलं आहे.

या योग दिनी मी म्हटलं होत कि तीन पिढ्या, कारण हा तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, म्हणून मी म्हटलं होत कि कुटुंबातील तीन पिढ्या एकत्रितपणे योग करत असतानाचे त्यांचं छायाचित्र मला पाठवा. काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. मला  या संबंधी अनेक छायाचित्रे आली, त्यातील काही निवडक छायाचित्रे  NarendraModiApp वर संग्रहित करण्यात आली आहेत. ज्याप्रकारे संपूर्ण जगभरात योगाची चर्चा होत आहे, त्यात एक गोष्ट समोर आली कि आजचा जो आरोग्याप्रती दक्ष समाज आहे, तो तंदुरुस्तीकडून वेलनेसच्या दिशेने पावलं टाकत आहे, आणि त्यांना कळून चुकलं आहे कि तंदुरुस्तीचे महत्व तर आहेच परंतु शांती मिळवण्यासाठी योग एक उत्तम मार्ग आहे.

(साउंड बाइट #)

आदरणीय पंतप्रधान, मी, अहमदाबाद वरून  डॉक्टर अनिल सोनारा बोलतोय , सर माझा एक प्रश्न आहे कि, केरळ मध्ये आपण देत असलेल्या भाषणाच्या वेळी आम्ही आपल्याला ऐकत होतो तेंव्हा विविध ठिकाणी आपण  भेट वस्तू च्या स्वरूपात पुस्तक  देत  होता ती पद्धत आता बंद का केली?  हि पद्धत आपण गुजरात मध्ये आपल्या कार्यालय पासून अवलंबिली होती परंतु येत्या काही दिवसात पुस्तक भेट म्हणून देण्याची पद्धत आढळून येत नाही. काय आपण यावर काही तोडगा काढू शकत नाही का? ज्या द्वारे पुन्हा पुस्तक भेट देण्याची चांगली बाब देशव्यापी होऊ शकेल ?

काही दिवसांपूर्वी मला माझ्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. केरळ मध्ये गेली काही वर्षे पी.एन. पनीकर प्रतिष्ठानातर्फे एक चांगला कार्यक्रम आयोजित केला जातो, आणि लोकांना पुस्तके वाचण्याची सवय लागावी, लोक पुस्तक वाचनाप्रति जागरूक व्हावे यासाठी वाचन दिन, वाचन महिना साजरा केला जातो. तर  मला त्याच्या उदघाटनाला जाण्याची संधी मिळाली. आणि मला तिथे हे देखील सांगण्यात आलं कि आम्ही बुके नाही तर बुक देतो. मला बरं वाटलं. आता मलाही जी गोष्ट माझ्या ध्यानातून निसटली होती, तिचे पुन्हा स्मरण झालं. कारण जेव्हा मी गुजरात मध्ये होतो, तेव्हा मी सरकारमध्ये एक परंपरा बनवली होती कि आपण पुष्पगुच्छ द्यायचा नाही , तर पुस्तक द्यायचं किंवा हातरुमाल   देऊन त्यानेच स्वागत करायचं.  तो देखील  खादीचा हातरुमाल, जेणेकरून खादीला चालना मिळेल. जोवर मी गुजरातमध्ये होतो, आम्हा सर्वांची सवय बनली होती मात्र इथे आल्यानंतर माझी ती सवय सुटली होती.

मात्र केरळला गेलो, आणि पुन्हा एकदा ती  सवय  जागरूक झाली. आणि मी तर आता सरकारमध्ये पुन्हा खालच्या लोकांना सूचना द्यायला सुरुवात केली आहे. आपण देखील हळू-हळू स्वभाव बनवू शकतो. पुष्पगुच्छांचे आयुष्य खूप कमी असतं. एकदा हातात घेतला कि मग ठेवून देतो. मात्र जर पुस्तक दिलं तर एक प्रकारे घराचा भाग बनतं , कुटुंबाचा भाग बनतं. खादीचा रुमाल देऊनही स्वागत केलं तर किती गरीब लोकांना मदत होईल. खर्च देखील कमी होतो आणि योग्य प्रकारे त्याचा उपयोगही होतो.  जेव्हा मी हि गोष्ट सांगत आहे, तर अशा गोष्टींचं किती ऐतिहासिक मूल्य असतं . गेल्या वर्षी मी जेव्हा इंग्लंडला गेलो होतो, तेव्हा लंडनमध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी मला भोजनासाठी निमंत्रित केलं होतं.

एक मातृसुलभ वातावरण होतं. अतिशय प्रेमाने त्यांनी मला जेवू घातलं, मात्र नंतर त्यांनी मला अतिशय आदराने भावात्मक स्वरात एक छोटासा खादीचा आणि धाग्यांनी विणलेला एक रुमाल दाखवला आणि त्यांच्या डोळ्यांत चमक होती, त्या म्हणाल्या कि जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा महात्मा गांधी यांनी मला हा रुमाल भेट म्हणून दिला होता, लग्नाच्या शुभेच्छा म्हणून. किती वर्ष लोटली, मात्र राणी एलिझाबेथ यांनी महात्मा गांधी यांनी दिलेला रुमाल सांभाळून ठेवला आहे. आणि मी गेलो तेव्हा अतिशय आनंदाने, त्या मला दाखवत होत्या. आणि जेव्हा मी पाहत होतो, तेव्हा त्यांचा आग्रह होता कि मी त्याला स्पर्श करून तो पहावा. महात्मा गांधी यांची एक छोटीशी भेट त्यांच्या आयुष्याचा भाग बनली, त्यांच्या इतिहासाचा भाग बनली. मला खात्री आहे कि या सवयी रातोरात बदलत नाहीत, आणि जेव्हा कधी असे म्हणतो तेव्हा टीकेचा धनी व्हावे लागते. मात्र तरीही अशा गोष्टी सांगायला हव्यात, प्रयत्न करत राहायला हवं. आता मी असं तर नाही म्हणू शकत कि मी कुठे गेलो आणि कुणी मला पुष्पगुच्छ भेट दिला तर मी त्याला नकार देईन. असं तर नाही करू शकणार. मात्र तरीही टीका होईल, मात्र बोलत राहिलं तर हळू-हळू सुधारणा देखील होतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, पंतप्रधान या नात्याने अनेक प्रकारची कामे असतात. फायलींमध्ये गुंतलेलो असतो, मात्र मी माझ्यासाठी एक सवय विकसित केली आहे की मला जी पत्रे येतात, त्यातली काही पत्रे मी रोज वाचतो आणि त्यामुळे मला सामान्य माणसाशी जुळून घेण्याची संधी मिळते. वेग-वेगळ्या प्रकारची पत्रे येतात, वेग-वेगळ्या प्रकारची माणसे पत्रे लिहितात. अलीकडेच मला एक असं पत्र वाचायला मिळालं, मला वाटतं की त्या बाबत मी तुम्हाला अवश्य सांगायला हवं. दूर दक्षिण भारतातल्या तामिळ नाडू मधील मदुराई इथल्या एक गृहिणी अरुलमोझी सर्वनन यांनी मला एक पत्र पाठवलं. आणि पत्र काय होत, तर त्यांनी लिहिलं होत की त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलांचं शिक्षण वगैरे लक्षात घेऊन काही ना काही आर्थिक उपक्रम हाती घेण्याचा विचार केला, जेणेकरून कुटुंबाला थोडी आर्थिक मदत होईल.

मी मुद्रा योजनेअंतर्गत बँकेतून पैसे घेतले आणि बाजारातून काही सामान आणून त्याचा पुरवठा करण्याच्या दिशेने काम सुरु केले. तेवढ्यात माझ्या लक्षात आले की भारत सरकार ने ई-बाजारपेठ नावाची एक यंत्रणा उभारली आहे. तर मी शोधलं, हे काय आहे? काही लोकांना विचारले, मी स्वतः त्यावर नोंदणी केली आहे , मी देश वासियांना सांगू इच्छितो की,  तुम्हाला सुद्धा अशी संधी मिळाली पाहिजे यासाठी इंटरनेट वर  ई. जी

 ई एम  ला भेट द्या , एक नव्या प्रकारची व्यवस्था आहे.  जो सरकारला माल  पुरवठा करू इच्छितो , झाडू विक्री करू इच्छितो , खुर्ची विकू इच्छितो , टेबल  पाठवू  इच्छितो , तो आपले नाव त्यावर नोंदणी करू शकतो.

कुठल्या दर्जाचा माल त्याच्या जवळ आहे हे तो लिहून पाठवू शकतो तसेच विक्री किंमत तो लिहू शकतो . सरकारी विभागांना सक्तीचे आहे कि त्यांनी या पोर्टलला भेट द्यावी , जाणून घ्यायला पाहिजे की   कोणते  पुरवठादार  असे आहेत जे  वस्तू दर्जाशी तडजोड न करता  स्वस्त दर अवलंबितो.  त्याला   आदेश  द्यायला  हवे यामुळे अभिकर्ते पद्धत बंद झाली . पूर्ण पारदर्शकता आली. ढवळाढवळ होत नाही , तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व व्यवहार होतात. ईईजीएम च्या अंतर्गत जे लोक नोंदणी करतात, सरकारचे सर्व विभाग ते बघतात. ऐजन्ट्स नसल्याने  बऱ्याच वस्तू स्वस्त मिळतात. 

या अरुलमोझी मॅडमनी सरकारच्या या संकेतस्थळावर त्या ज्या-ज्या वस्तू पुरवू शकतात त्याची नोंदणी केली. आणि गम्मत अशी कि त्यांनी मला जे पत्रं लिहिलं आहे ते खूप रोचक आहे. त्यांनी लिहिलं आहे की एक तर त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत पैसे मिळाले, त्यांचा व्यवसाय सुरु झाला, E-GEM वर मी काय पुरवू शकते, याची यादी मी लिहिली आणि मला पंतप्रधान कार्यालयाकडून ऑर्डर मिळाली. माझ्यासाठी हि नवीन बातमी होती की पंतप्रधान कार्यालयाने काय मागवल असेल. तर त्यांनी लिहिलं आहे की पंतप्रधान कार्यालयाने माझ्याकडून दोन थर्मोस विकत घेतले आणि १,६०० रुपयये मला पाठवण्यात आले. हे आहे सक्षमीकरण. हि आहे उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची संधी. जर अरुलमोझी यांनी मला पत्रं लिहिलं नसत तर बहुदा माझ्याही ध्यानात आलं नसतं की  E-GEM व्यवस्थेत दूरवर एक गृहिणी छोटंसं काम करत आहे, तिचा माल पंतप्रधान कार्यालयाकडून खरेदी केला जाऊ शकतो. हीच देशाची ताकद आहे. यामध्ये पारदर्शकता आहे, यामध्ये सक्षमीकरण देखील आहे, यामध्ये उद्यमशीलताही आहे,. सरकारी ई-बाजारपेठ-जीईएम. माझी इच्छा आहे कि ज्याला कुणाला अशा प्रकारे सरकारला आपला माल विकायचा आहे त्यांनी यात स्वतःला अधिकाधिक जोडून घ्यावं. मला वाटते कि किमान सरकार आणि कमाल प्रशासन याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे- किमान किंमत आणि कमाल सुलभता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, एकीकडे आपण योगाबाबत अभिमान बाळगतो, तर दुसरीकडे अंतराळ विज्ञानात आपले जे यश आहे त्याचाही अभिमान बाळगू शकतो. आणि हेच तर भारताचे वैशिष्ट्य आहे कि जर आपले पाय योगसाधनेसाठी  जमिनीवर आहेत तर आपली स्वप्नं दूर आकाशातली क्षितिजे पार करण्यासाठी देखील आहेत. काही दिवसांपूर्वी क्रीडा क्षेत्रातही आणि विज्ञानातही भारताने खूप काही करून दाखवलं आहे. भारत आज केवळ जमिनीवरच नव्हे तर अंतराळातही आपली पताका फडकवत आहे. दोनच दिवसांपूर्वी इसरोने कार्टोसात-२ मालिकेतल्या उपग्रहासह ३० लघु उपग्रह प्रक्षेपित केले. आणि या उपग्रहांमध्ये भारताव्यतिरिक्त फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका अशा जवळपास १४ देशांचे उपग्रह समाविष्ट होते. आणि भारताच्या या लघु उपग्रह अभियानामुळे कृषी क्षेत्रात शेतीच्या कामात, नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात बरीच मदत होईल. काही दिवसांपूर्वीची हि गोष्ट आपणा सर्वांच्या लक्षात असेल, इसरोने  ‘GSAT-19’ चे यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आणि आतापर्यंत भारताने जे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यामध्ये हे सर्वात वजनदार उपग्रह होते. आणि आपल्या देशातल्या वृत्तपत्रांनी तर हत्तीच्या वजनाशी त्याची तुलना केली होती. तर तुम्ही कल्पना करू शकता कि आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात किती मोठं काम केलं आहे.

१९ जूनला मंगळ मोहिमेला १ हजार दिवस पूर्ण झाले. तुम्हा सर्वाना माहित असेल कि जेव्हा मंगळ मोहिमेसाठी आपण यशस्वीपणे कक्षेत स्थान मिळवलं होत तेव्हा हि संपूर्ण मोहीम ६ महिन्याच्या कालावधीसाठी होती. त्याचे आयुष्य सहा महिन्याचं होतं. मात्र मला आनंद वाटतो कि आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांची ताकद आहे कि ६ महिने तर पार केलेच , पण १ हजार दिवसांनंतरही आपलं हे मंगळयान अभियान काम करत आहे. छायाचित्रे पाठवत आहे, माहिती देत आहे, वैज्ञानिक माहिती मिळत आहे, तर निर्धारित आयुष्यापेक्षा अधिक काळ काम करत आहे. एक हजार दिवस पूर्ण होणं आपल्या वैज्ञानिक प्रवासासाठी आपल्या अंतराळ प्रवासासाठी महत्वाची बाब आहे.

सध्या क्रीडा क्षेत्रातही आपण पाहत आहोत कि आपल्या युवकांची कामगिरी उंचावत आहे. शिक्षणाबरोबरच खेळांमध्येही आपल्या तरुण पिढीला भवितव्य दिसत असल्याचं जाणवत आहे, आणि आपल्या खेळाडूंमुळे, त्यांच्या पराक्रमामुळे, त्यांच्या कामगिरीमुळे देशाचे नाव उज्वल होत आहे. नुकतंच भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यांनी इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत विजय मिळवून देशाचा गौरव वाढवला. या विजयाबद्दल मी त्यांचे  आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वी मला धावपटू पी.टी. उषा यांच्या उषा स्कुल ऑफ ऍथलेटिक्स च्या सिंथेटिक ट्रॅकच्या  उदघाटन समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. आपण खेळांना जितके प्रोत्साहन देऊ, खेळभावनाही त्याबरोबर येईल. व्यक्तिमत्व विकासात खेळ महत्वाची भूमिका पार पाडतो. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळाचे महत्व अन्यसाधारण आहे. देशात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. जर आपल्या कुटुंबातील मुलांना खेळात रस असेल, तर त्यांना संधी द्यायला हवी. त्यांना मैदानातून उचलून खोलीत बंद करून , अभ्यासासाठी प्रवृत्त केले जाऊ नये.  त्यांनी अभ्यासही करावा, त्यातही ते चमकदार कामगिरी दाखवू शकत असतील तर दाखवावी, मात्र जर खेळात त्याचे प्राविण्य आहे, आवड आहे, तर शाळा, महाविद्यालय, कुटुंब, आसपासचे लोक प्रत्येकानी त्याला बळ द्यायला हवं, प्रोत्साहन द्यायला हवं. पुढल्या ऑलिम्पिकसाठी प्रत्येकाने स्वप्नं बाळगायला हवीत.

पुन्हा एकदा माझ्या प्रिय देशबांधवांनो, पावसाळी ऋतू, लागोपाठ येणारे सण, एक प्रकारे या कालखंडाची अनुभूतीच  नवीन असते. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो. पुढल्या ‘मन कि बात’ च्या वेळी पुन्हा काही नवीन गोष्टी सांगेन.. नमस्कार. 

  • Priya Satheesh January 15, 2025

    🐯
  • krishangopal sharma Bjp December 20, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  • krishangopal sharma Bjp December 20, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  • krishangopal sharma Bjp December 20, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  • Chhedilal Mishra December 05, 2024

    Jai shrikrishna
  • ज्योती चंद्रकांत मारकडे February 08, 2024

    जय हो
  • Babla sengupta December 23, 2023

    Babla sengupta
  • Diwakar Sharma December 20, 2023

    jay shree ram
  • S Babu October 09, 2023

    🙏
  • Laxman singh Rana August 21, 2022

    नमो नमो 🇮🇳🌹
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 28 lakh companies registered in India: Govt data

Media Coverage

Over 28 lakh companies registered in India: Govt data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti
February 19, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.

Shri Modi wrote on X;

“I pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.

His valour and visionary leadership laid the foundation for Swarajya, inspiring generations to uphold the values of courage and justice. He inspires us in building a strong, self-reliant and prosperous India.”

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.

त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.”