माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले.
मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे :
"श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. प्रणव बाबू एकमेवेद्वितीय सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते तसेच ते एक उत्कृष्ट राजकारणी, एक अद्भुत प्रशासक आणि ज्ञानाचे भांडार होते. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना एखाद्या मुद्यावर संपूर्ण लोकांमध्ये एकमत निर्माण करण्याच्या अनोख्या क्षमतेचे वरदान लाभले होते. हे वरदान त्याना त्यांच्या विपुल अनुभवातून, शासन आणि भारताच्या संस्कृतीबद्दलची सखोल ज्ञान यामुळे लाभले होते. आपल्या राष्ट्राबाबतची त्यांची दृष्टी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”
Remembering Shri Pranab Mukherjee on his birth anniversary. Pranab Babu was a one-of-a-kind public figure—a statesman par excellence, a wonderful administrator and a repository of wisdom. His contributions to India’s development are noteworthy. He was blessed with a unique… pic.twitter.com/qNNdUcux2t
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2024