पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.राम विलास पासवान हे एक उत्कृष्ट नेते होते,त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सक्षमीकरणासाठी तसेच मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे :
मी माझे प्रिय मित्र आणि भारताच्या महान नेत्यांपैकी एक असेलेल्या राम विलास पासवान यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहतो. ते एक उत्कृष्ट नेते होते,त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सक्षमीकरणासाठी तसेच मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित होते. मला त्यांच्यासोबत अतिशय जवळून दीर्घ काळ काम करता आले हे माझे भाग्य आहे.अनेक विषयांमधील त्यांच्या दूरदृष्टीला मुकल्याची भावना मला जाणवते.
I pay homage to my very dear friend and one of India's tallest leaders, Shri Ram Vilas Paswan Ji on his Punya Tithi. He was an outstanding leader, fully devoted to empowering the poor and dedicated to building a strong and developed India. I am fortunate to have worked with him… pic.twitter.com/ceMJYFHHjS
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024