क्षयरोग निर्मूलनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना अतिशय महत्त्वाचे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यात देशाने मिळवलेल्या यशावर प्रकाश टाकला.
भारताने 2015 ते 2023 या कालावधीत क्षयरोगाचे प्रमाण 17.7% ने कमी करण्यात प्राप्त केलेल्या उल्लेखनीय प्रगतीला जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित करण्याच्या संदर्भातील, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिले आहे:
"प्रशंसनीय प्रगती! क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि अभिनव प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक भावनेच्या माध्यमातून, आपण क्षयरोगमुक्त भारतासाठी कार्य करत राहू.”
Commendable progress!
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2024
The decline in TB incidence is an outcome of India’s dedicated and innovative efforts. Through a collective spirit, we will keep working towards a TB-free India. https://t.co/qX4eM0kj3n