पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :
“ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक असणाऱ्या या दिव्य ग्रंथाच्या उद्गम दिनाच्या रुपात साजरा केला जाणारा हा पावन उत्सव प्रत्येकाला कर्मयोगाचा पथ दाखवणारा ठरो. जय श्री कृष्ण!”
समस्त देशवासियों को गीता जयंती की अनंत शुभकामनाएं। भारतीय संस्कृति, अध्यात्म और परंपरा के मार्गदर्शक दिव्य ग्रंथ के उद्गम दिवस के रूप में मनाया जाने वाला यह पावन उत्सव हर किसी को कर्मयोग की राह दिखाए। जय श्री कृष्ण! pic.twitter.com/q2w41mGaOA
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2024