पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नायजेरियामधील हिंदी भाषिक प्रेमींनी दाखविलेल्या उत्साहाची प्रशंसा केली आहे .
आपल्या एक्स पोस्ट वर त्यांनी नमूद केले आहे
"नायजेरियातील हिंदी प्रेमींनी माझ्या आगामी भेटीविषयी जो उत्साह दाखवला आहे, तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे! या भेटीसाठी मी देखील खूप उत्सुक आहे."
नाइजीरिया के हिन्दी प्रेमियों ने जिस प्रकार वहां के मेरे दौरे को लेकर उत्साह दिखाया है, वो हृदय को छू गया है! अपनी इस यात्रा को लेकर बहुत उत्सुक हूं। @MEAIndia@NigeriaMFA https://t.co/KtQJYUFjty
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2024
नायजेरियातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकृत एक्स पोस्टला @india_nigeria प्रतिसाद म्हणून पंतप्रधानांनी आपला जो संदेश पोस्ट केला आहे, त्यात नायजेरियातील नागरीक 16-17 नोव्हेंबर 2024 दरम्यान नायजेरियाला भेट देणाऱ्या पंतप्रधानांचे हिंदी भाषेत स्वागत करताना दिसत आहेत.