पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (पीएमएनआरएफ) मधून मृतांच्या नातेवाइकांसाठी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“गुजरातच्या मेहसाणा येथे भिंत कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल माझ्या तीव्र शोकसंवेदना. ईश्वर त्यांना ही वेदना सहन करण्याची शक्ती देवो. तसेच जखमींनी लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे:
“मेहसाणा, गुजरात येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.”
गुजरात के मेहसाणा में दीवार गिरने से हुई दुर्घटना अत्यंत दुखद है। इसमें जिन्होंने अपनों को खोया है, उनके प्रति मेरी गहरी शोक-संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहन करने का संबल प्रदान करे। इसके साथ ही मैं घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में…
— PMO India (@PMOIndia) October 12, 2024
An ex-gratia of Rs. 2 lakhs from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the mishap in Mehsana, Gujarat. Rs. 50,000 would be given to those injured. https://t.co/KUJqI32dEW
— PMO India (@PMOIndia) October 12, 2024