उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर सामाईक केलेला संदेश :
उत्तर प्रदेशात लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. जखमी लवकर बरे होवोत, हीच कामना. प्रत्येक मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi
The loss of lives due to a building mishap in Lucknow, Uttar Pradesh is saddening. Prayers with those who lost their loved ones. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs.…
— PMO India (@PMOIndia) September 8, 2024