पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिलांचे आशियाई हॉकी अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या संघाचे विजेतेपद उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल.
पंतप्रधानांनी 'एक्स' या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले:
“अभूतपूर्व यश!
महिला हॉकीचे आशियाई अजिंक्यपद मिळवणाऱ्या आपल्या हॉकी संघाचे अभिनंदन. त्यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान अतिशय उत्तम खेळ केला. त्यांचे यश उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत राहील.”
A phenomenal accomplishment!
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024
Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes.