पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन येथे भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. ते म्हणाले की, जेव्हा केव्हा भारताकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळाल्या तेव्हा तेव्हा वॉशिंग्टन येथील भारतीय समुदायाला खूप आनंद झाला आहे. आणि त्यांनी नेहमीच भारताची एका वेगळ्या उंचीवर अपेक्षा केली आहे.

मोदी यांनी , भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या सहभागाबद्दल आणि निभावलेल्या भूमिकेबद्दल प्रशंसा केली. पंतप्रधान म्हणाले की, भारतातल्या लोकांना आता संधी आणि योग्य वातावरण मिळत असून ते लवकरच भारतात परिवर्तन घडवून आणतील.
|
पंतप्रधानांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या तंत्रज्ञानाबद्दल सांगितले. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाच्या फायद्याविषयी बोलत असतांना ते म्हणाले की, यामुळे अनुदानासाठी चांगली उद्दिष्टे गाठण्यासाठी मदत होते व मध्यस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट घडवून आणता येते. एलपीजीचे अनुदान ज्या कुटुंबांनी दिले त्यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, यामुळे पाच कोटी कुटुंबाना एलपीजीची जोडणी देता आली. "मी जेव्हा विकसित भारताचा विचार करतो,तेव्हा सुदृढ भारताचा विचार असतो विशेषतः महिला आणि बालकांचा". असेही ते म्हणाले.
|
पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन चालवण्यात येऊन, आधुनिक भारताची निर्मिती करायची आहे. जेव्हा परिपूर्ण धोरणे आणि उत्तम प्रशासन असेल तर भारताचा नक्कीच विकास होईल.

दहशतवादासंबंधी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अलिकडेच भारताने सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला. जगाने आता दहशतवादाच्या दुष्परिणामांना समजून घेतले आहे.
|
त्यांनी भारतीय विदेश मंत्रालयाने विशेषतः परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची त्यांनी जगभरातील संकटात असलेल्या लोकांसाठी केलेल्या मदतीची प्रशंसा केली .

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
For PM Modi, women’s empowerment has always been much more than a slogan

Media Coverage

For PM Modi, women’s empowerment has always been much more than a slogan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 मार्च 2025
March 08, 2025

Citizens Appreciate PM Efforts to Empower Women Through Opportunities