गुजरातमधील देहगाम येथे पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देहगाम येथील दुर्घटनेत बुडून मृत्यू झालेल्या प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे.”
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the drowning incident in Dehgam, Gujarat. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/Egvnq7Vlnr
— PMO India (@PMOIndia) September 14, 2024