नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“पंतप्रधानांनी नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यातील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap in Tanahun district, Nepal. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/qUtVrj4ipF
— PMO India (@PMOIndia) August 24, 2024