मी 21 ते 27 सप्टेंबर 2019 या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी ह्युस्टनला जाणार आहे, त्यानंतर, मी न्युयॉर्क इथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या 74 व्या सर्वसाधारण सभेच्या उच्च स्तरीय बैठकीला देखील उपस्थित राहणार आहे.
भारत-अमेरिका ऊर्जा भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मी अमेरिकेतील प्रमुख ऊर्जा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. ‘ऊर्जा’ हे परस्पर फायदेशीर सहकार्याचे नवीन क्षेत्र उदयाला येत आहे आणि वेगाने आमच्या द्विपक्षीय संबंधांचा महत्वाचा पैलू बनत आहे.
ह्युस्टन मध्ये मी भारतीय-अमेरिकी समुदायाची भेट घेऊन त्यांना संबोधित करण्यासाठी उत्सुक आहे. विविध क्षेत्रातील त्यांचे यश, जीवनातील विविध क्षेत्रांमाधिल अमेरिकेतील योगदान, भारताशी असलेले त्याचे मजबूत बंध आणि आपल्या दोन्ही लोकशाही दरम्यान ते बजावत असलेल्या पूलाची भूमिका आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, समुदायाला संबोधित करण्याच्या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित राहणार आहेत ही माझ्यासाठी आणि भारतीय समुदायासाठी सन्मानाची बाब आहे. माझ्यासह भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही पहिली वेळ आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आपल्यासाठी हा एक नवीन टप्पा आहे.
ह्युस्टन मध्ये असताना, मला भारतीय-अमेरिकी समुदायाच्या विविध गटांशी आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी देखील मिळणार आहे.
न्युयॉर्क मध्ये मी संयुक्त राष्ट्रांच्या विविध प्रमख कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे संस्थापक सदस्य म्हणून सहभागी झाल्यापासून, शांतता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी आणि जगातील सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने नेहमीच वचनबद्धता दर्शवली आहे.
यावर्षी, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 74 व्या अधिवेशनाचा “गरिबी निर्मुलन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, हवामान कृती आणि समावेशासाठी बहुपक्षीय प्रयत्नांची जपणूक करणे” हा विषय आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अनेक कठीण आव्हाने आहेत – नाजूक जागतिक अर्थव्यवस्था, जगातल्या अनेक भागांमध्ये अशांतता आणि तणाव, दहशतवादाचा वाढता प्रसार, हवामान बदल आणि दारिद्र्याचे स्थानिक जागितक आव्हान. त्यांना मजबूत जागतिक वचनबद्धता आणि एकत्रित बहुपक्षीय कृती आवश्यक आहे. भारत योग्य भूमिका साकारत असलेल्या प्रतिसादात्मक, परिणामकारक आणि समावेशक सुधारित बहुपक्षीयतेचा मी पुनरुच्चार करेन.
शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य करताना आपल्याला जे यश लाभले आहे त्याचे सादरीकरण मी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात करेन. 23 सप्टेंबर रोजी होणऱ्या हवामान कृती परिषदेत मी जागतिक उद्दिष्टे आणि आमच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेच्या अनुषंगाने हवामान बदलाच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी भारताच्या मजबूत उपाययोजनांना अधोरेखित करणार आहे.
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजवरील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात, आयुष्मान भारत कार्यक्रमासह अनेक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना आरोग्य सेवा देण्याच्या भारताच्या कर्तुत्वाविषयी सांगण्यास मी उत्सुक आहे.
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्र संघात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचे यजमान पद भारत भूषवणार आहे, आजच्या जगात गांधीवादी विचार आणि मूल्य यांची निरंतर प्रासंगिकता अधोरेखित करेल. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अनेक देशांचे प्रमुख या कार्यक्रमात गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करतील आणि त्यांच्या संदेशांचे महत्व अधोरेखित करतील.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मी इतर देशांचे नेते आणि संयुक्त राष्ट्र संघटनां सोबतच्या द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होईन. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भारत पहिल्यांदाच पॅसिफिक बेटातील राज्यांच्या नेत्यांसोबत आणि कॅरीकोम गटाच्या नेत्यांसोबत नेतृत्व पातळीवर संवाद साधणार आहे. यामुळे आमचे दक्षिण-दक्षिण सहकार्य आणि भागीदारी वृद्धिंगत होईल.
काही दिवसातच ह्युस्टन आणि न्युयॉर्क मध्ये मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेण्यास उत्सुक आहे. आपले दोन्ही देश आणि नागरिकांना आणखी फायदे होण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेऊ. शिक्षण, कौशल्य, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश या क्षेत्रातील भागीदारीच्या समृद्ध संभाव्यतेसह आणि आर्थक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये भारताला सक्षम करणारा अमेरिका आमच्या राष्ट्रीय विकासामधील एक महत्वपूर्ण भागीदार आहे. सामायिक मुल्ये, एकत्रित हितसंबंध आणि पूरक सामर्थ्ये जगातील सर्वात जुन्या आणि मोठ्या लोकशाहीमध्ये नैसर्गिक भागीदारीचा पाया प्रदान करतात. आपण एकत्रित काम करताना अधिक शांततापूर्ण, स्थिर, सुरक्षित, शाश्वत आणि समृद्ध जग निर्माण करण्यासाठी योगदान देऊ शकतो.
माझ्या न्युयॉर्क भेटी दरम्यान, अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या महत्वपूर्ण घटकांवर देखील चर्चा केली जाईल. ब्लूमबर्ग जागतिक व्यापार मंचाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करण्यास आणि अमेरिकन व्यावसायिक नेत्यांना भारताच्या आर्थिक विकासात आणि परिवर्तनात अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी उत्सुक आहे. ग्लोबल गोलकीपर गोल्स पुरस्कार, 2019 प्रदान करण्याच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या निर्णयामुळे माझा सन्मान झाला आहे.
मला खात्री आहे की, माझी ही भेट भारताला संधींची भूमी, विश्वासू भागीदार आणि एक जागतिक नेतृत्व म्हणून सादर करेल आणि अमेरिकेसोबतच्या आपल्या संबंधांना एक नवीन ऊर्जा प्रदान करायला सहाय्य करेल.