महामहीम,
अध्यक्ष बायडेन ,
पंतप्रधान मॉरिसन, आणि
पंतप्रधान सुगा,
मित्रांसमवेत असणे चांगले असते !
या उपक्रमाबद्दल मी अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानतो.
महामहिम,
आपण आपल्या लोकशाही मूल्यांनी एकत्रित आहोत आणि एक मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद -प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध आहोत.
आपला आजचा विषय - लस, हवामान बदल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रानी - क्वाडला जगाच्या कल्याणासाठी एक शक्ती बनवले आहे .
जग हे एक कुटुंब मानणाऱ्या वसुधैव कुटुंबकम या भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाचा विस्तार म्हणून मी याकडे सकारात्मक दृष्टी म्हणून पाहतो.
आपल्या सामायिक मूल्यांची प्रगती करण्यासाठी आणि सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आपण पूर्वीपेक्षा एकत्रितपणे काम करू.
आजच्या शिखर परिषदेतून असे दिसून येते क्वाड देश प्रगल्भ झाले आहेत.
ते आता या प्रदेशातील स्थैर्याचा महत्त्वपूर्ण स्तंभ असतील.
धन्यवाद.