अस्ताना येथे सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कझाकस्तान, चीन आणि उझबेकीस्तानच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.
2017-18 या वर्षात संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष नूरसुलतान नजरबायेव्ह यांचे गुरुवारी घेतलेल्या बैठकीत अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्ष नजरबायेव्ह यांनी पंतप्रधानांचे अगत्याने स्वागत केले आणि 2015 साली त्यांनी दिलेल्या कझाकस्तान भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. या भेटीदरम्यानच्या सर्व निर्णय आणि कराराच्या प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला. कझाकस्तान हा भारताला सर्वात मोठया प्रमाणावर युरेनियमचा पुरवठा करणारा देश आहे आणि दोन्ही पक्षांनी ही भागिदारी सुरु ठेवण्याबाबत सहमती दर्शवली. हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
कझाकस्तानला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य होण्याचे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले. दोन्ही नेत्यांनी जोडणी वाढविण्यासाठीच्या महत्वाबाबतही चर्चा केली. इराणमधील चाबाहार बंदरामार्फत जोडणीच्या विस्ताराचा मुद्दाही चर्चिला गेला. दिल्ली आणि अस्ताना दरम्यान दोन विमानेही लवकरच सोडली जाणार आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांच्याशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकारात्मक भेट झाली. शांघाय सहकार्य संघटनेत भारताला पूर्णवेळ सदस्य म्हणून प्रवेश करता यावा यासाठी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत आणि चीनमधील संबंध स्थिर असून दोन्ही देशांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. व्यापार, गुंतवणूक, जोडणी, युवा आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण अशा संकल्पनांवर योवळी चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उझबेकीस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झिजोएव्ह यांचीही भेट घेतली. अर्थकारण व्यापार आणि आरोग्यविषयक अनेक मुद्दयांबाबत त्यांनी चर्चा केली.
PM @narendramodi and President Xi Jinping of China held talks on the sidelines of the SCO Summit in Astana. pic.twitter.com/1qgYajvhuj
— PMO India (@PMOIndia) June 9, 2017
President Shavkat Mirziyoyev of Uzbekistan met PM @narendramodi. Both leaders discussed deepening bilateral cooperation. pic.twitter.com/Yrom5RyW5W
— PMO India (@PMOIndia) June 9, 2017