शुभ सकाळ ह्युस्टन,
शुभ सकाळ टेक्सास,
शुभ सकाळ अमेरिका,
भारत आणि जगभरातील भारतीयांना माझा नमस्कार.
मित्रांनो,
आज सकाळी आपल्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे जिला कोणत्याही परीचयाची आवशक्यता नाही. त्यांचे नाव माहित नाही असे या जगात कोणी नाही.
जागतिक राजकारणावरील प्रत्येक संभाषणात त्यांचे नाव समोर येतेच. कोट्यावधी लोकं त्यांच्या शब्दाचे अनुसरण करतात.
या महान देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याआधीच ते घराघरात लोकप्रिय होते.
विशेष कार्यकारी अधिकारी ते कमांडर इन चीफ, बोर्डरूम ते ओव्हल कार्यालय, स्टुडियो ते जागतिक मंच, राजकारणापासून ते अर्थव्यवस्था आणि सुरक्षेपर्यंत सर्व क्षेत्रात त्यांनी खोल प्रभाव पाडला आहे.
आज ते येथे आपल्या सोबत आहेत. या भव्य स्टेडीयम आणि भव्य सोहळ्यात त्यांचे स्वागत करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.
आणि मी असे म्हणू शकतो की, मला त्यांना वारंवार भेटण्याची संधी मिळाली आहे. आणि प्रत्येकवेळी मला मित्रत्व, उर्जेने परिपूर्ण असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटले.
हे विलक्षण आहे, हे अभूतपूर्व आहे.
मित्रांनो,
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही बऱ्याच वेळा भेटलो आहोत आणि प्रत्येक वेळी ते मला नेहमीप्रमाणे प्रेमळ, मैत्रीपूर्ण, उत्साही आणि ज्ञानी जाणवले. मी आणखी काही गोष्टींसाठी त्याचे कौतुक करतो.
त्यांची नेतृत्वशक्ती, अमेरिकेबद्दलची उत्कटता, प्रत्येक अमेरिकेन नागरिकाची चिंता, अमेरिकन भविष्यावरील त्यांचा विश्वास आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा दृढ संकल्प.
आणि त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत बनविली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि जगासाठी बरेच काही साध्य केले आहे.
मित्रांनो,
भारतीयांचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध आहेत. उमेदवार ट्रम्प यांचे – अबकी बार ट्रम्प सरकार हे शब्द जोरात आणि स्पष्ट ऐकू आले होते आणि व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या त्यांच्या जल्लोषाने लाखो चेहरे आनंदाने आणि कौतुकांनी उजळले होते.
मी जेव्हा त्यांना प्रथमच भेटलो होतो तेव्हा ते मला म्हणाले,‘भारत हा व्हाईट हाऊसचा खरा मित्र आहे.’ तुमची आजची उपस्थिती याचा मोठा पुरावा आहे.
मागील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांनी आपले संबंध वेगळ्या उंचीवर नेले आहेत. राष्ट्राध्यक्ष महोदय आज सकाळी तुम्ही ह्युस्टन येथे जगातील दोन मोठ्या लोकशाहीच्या भागीदारीचा उत्साह अनुभवू शकता.
आपल्या दोन देशांमधील नागरिकांच्या दृढ संबंधाची खोली तुम्ही अनुभवू शकता.या सर्व संबंधांच्या केंद्रस्थानी ह्यूस्टन ते हैदराबाद, बोस्टन ते बंगळूरू, शिकागो ते शिमला, लॉस एंजेलिस ते लुधियाना, न्यू जर्सी ते नवी दिल्ली येथील लोकं आहेत.
जगभरातील वेगवेगळ्या वेळेनुसार हा कार्यक्रम रविवारी रात्री उशिरा जारी होत असला तरीही शेकडो लाखो लोकं टिव्ही वर हा कार्यक्रम पाहत आहेत.ते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहेत.
अध्यक्ष महोदय 2017 मध्ये तुम्ही मला तुमच्या कुटूंबाची ओळख करून दिली आणि आज मी तुम्हाला माझ्या परिवाराची ओळख करून दिली.
बंधू आणि भगिनींनो हे आहेत माझे मित्र, भारताचे मित्र, अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.