21व्या आसियान-भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान श्री. सोनेक्से सिफानडोन यांच्या निमंत्रणावरून व्हिएन्टिन, लाओ पीडीआर येथे आज मी दोन दिवसांच्या भेटीवर जात आहे.
या वर्षी आमच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला एक दशक पूर्ण होत आहेत. आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि आमच्या सहकार्याची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी मी आसियान नेत्यां समवेत होणा-या चर्चेत सहभागी होणार आहे.
पूर्व आशिया शिखर परिषदेमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसमोरील आव्हानांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
लाओ पीडीआर सह या क्षेत्रातील इतर देशांशी आम्ही दृढ सांकृतिक आणि नागरी संबंध सामायिक करतो आणि हे संबंध बौद्ध धर्म आणि रामायणाच्या सामायिक वारशामुळे अधिक समृद्ध झाले आहेत.आमचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी लाओ पीडीआर च्या नेत्यांशी होणाऱ्या भेटींबाबत मी उत्सुक आहे.
माझ्या या दौऱ्यामुळे आसियान देशांशी असलेले आमचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास मला वाटतो.