GoI is in regular touch with the manufacturers to enhance production of medicines & extend all help needed
Production of all drugs including Remdesivir have been ramped up significantly in the last few weeks
Supply of oxygen is now more than 3 times the supply during the peak of first wave

प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धता आणि पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

कोविड आणि म्युकोरमायकोसिस या दोन्हींच्या व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या पुरवठ्यावर सरकार सक्रियपणे देखरेख करत असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. उत्पादन वाढविण्यासाठी व गरजेची सर्व मदत देण्यासाठी सरकार सातत्याने उत्पादकांच्या संपर्कात असल्याचेही मंत्रिमहोदयांनी पंतप्रधानांना सांगितले. अशा प्रत्येक औषधद्रव्यांच्या आणि त्यांच्या घटकांच्या उत्पादन व साठ्याविषयीही माहिती देण्यात आली. राज्यांना चांगल्या प्रमाणात औषधे पुरविण्यात येत असल्याबद्दल चर्चा झाली. रेमडेसीवीरसह सर्व औषधद्रव्यांचे उत्पादन गेल्या काही आठवड्यांत भरघोस वाढविण्यात आल्याचेही पंतप्रधानांना सांगण्यात आले. "भारतात औषधनिर्मिती क्षेत्र अतिशय मजबूत असून सरकारने त्याच्याबरोबर सातत्यपूर्ण समन्वयाचे धोरण ठेवल्याने सर्व औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत आहेत", असे पंतप्रधान म्हणाले.

देशात प्राणवायूची उपलब्धता आणि पुरवठा याचाही आढावा पंतप्रधानांनी घेतला. पहिल्या लाटेच्या चरमबिंदूच्या वेळी असणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत आता प्राणवायूचा तिपटीपेक्षा अधिक पुरवठा होत असल्याविषयी यावेळी चर्चा झाली. ऑक्सिजन रेल्वे आणि प्राणवायूसाठी भारतीय वायुदलाच्या विमानांच्या उड्डाणांविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर या सामग्रीच्या खरेदीची स्थिती तसेच पीएसए पद्धतीच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीची सद्यस्थिती- याविषयीही त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

राज्यांनी व्हेन्टिलेटर्स म्हणजेच जीवरक्षक प्रणालींचे कार्यान्वयन ठराविक कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच उत्पादकांच्या मदतीने त्यातील तांत्रिक व प्रशिक्षणविषयक अडचणी सोडवून घ्याव्यात असा अभिप्राय पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi visits the Indian Arrival Monument
November 21, 2024

Prime Minister visited the Indian Arrival monument at Monument Gardens in Georgetown today. He was accompanied by PM of Guyana Brig (Retd) Mark Phillips. An ensemble of Tassa Drums welcomed Prime Minister as he paid floral tribute at the Arrival Monument. Paying homage at the monument, Prime Minister recalled the struggle and sacrifices of Indian diaspora and their pivotal contribution to preserving and promoting Indian culture and tradition in Guyana. He planted a Bel Patra sapling at the monument.

The monument is a replica of the first ship which arrived in Guyana in 1838 bringing indentured migrants from India. It was gifted by India to the people of Guyana in 1991.