मालदीवच्या परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत डॉ. मोहम्मद असीम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
“भारत आणि मालदीव या शेजारी राष्ट्रांदरम्यानचे घनिष्ट ऐतिहासिक सांस्कृतिक आणि हिंदी महासागरातील सागरी संबंध” या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मालदीवच्या “इंडिया फर्स्ट” धोरणानुसार भारताशी संबंध ठेवण्याबाबत मालदीव कटीबध्द असल्याचा विशेष दूत असीम यांनी पुनरुच्चार केला.
भारत सदैव मालदीवचा विश्वसनीय आणि जवळचा शेजारी असून मालदीवच्या विकास आणि सुरक्षा यांना सदैव पाठिंबा देईल असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला भेट देण्याबाबतच्या राष्ट्राध्यक्ष यामीन यांच्या आमंत्रणाचा असीम यांनी पुनरुच्चार केला. या आमंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले आणि योग्य वेळी भेट देण्याचे मान्य केले. विशेष दूत असीम यांनी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या शुभेच्छा नरेंद्र मोदींना दिल्या. पंतप्रधान मोदींनीही यामीन यांना शुभेच्छा दिल्या.