दिवंगत सुषमा स्वराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित प्रार्थनासभेत पंतप्रधानांचा सहभाग सुषमाजी बहुआयामी व्यक्तिमत्व होत्या, त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचं जवळून दर्शन झालं – पंतप्रधान सुषमाजींची भाषणं प्रभावी आणि प्रेरणादायी होती – पंतप्रधान मोदी मंत्रिपदाची कोणतीही जबाबदारी पार पाडताना सुषमाजींनी तिथल्या कार्यसंस्कृतीत उल्लेखनीय बदल घडवून आणला-पंतप्रधान परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पारंपारिकरित्या प्रोटोकॉलशी जोडलेले असते मात्र सुषमाजींनी एक पाऊल पुढे जात ते नागरिकस्नेही बनवले-पंतप्रधान सुषमाजी नेहमी मनातलं ठामपणे बोलायच्या-पंतप्रधानदिवंगत सुषमा स्वराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित प्रार्थनासभेत पंतप्रधानांचा सहभाग सुषमाजी बहुआयामी व्यक्तिमत्व होत्या, त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचं जवळून दर्शन झालं – पंतप्रधान सुषमाजींची भाषणं प्रभावी आणि प्रेरणादायी होती – पंतप्रधान मोदी मंत्रिपदाची कोणतीही जबाबदारी पार पाडताना सुषमाजींनी तिथल्या कार्यसंस्कृतीत उल्लेखनीय बदल घडवून आणला-पंतप्रधान परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पारंपारिकरित्या प्रोटोकॉलशी जोडलेले असते मात्र सुषमाजींनी एक पाऊल पुढे जात ते नागरिकस्नेही बनवले-पंतप्रधान सुषमाजी नेहमी मनातलं ठामपणे बोलायच्या-पंतप्रधान

Published By : Admin | August 13, 2019 | 19:12 IST
Sushma Ji was a multifaceted personality; Karyakartas of the BJP have seen very closely what a great personality she was: PM
Sushma Ji’s speeches were both impactful as well as inspiring: PM Modi
In any ministerial duty she held, Sushma Ji brought about a marked change in the work culture there: PM
One would conventionally associate the MEA with protocol but Sushma Ji went a step ahead and made MEA people-friendly: PM
Sushma Ji never hesitated to speak her mind; she spoke with firmness: PM
Sushma Ji Sushma Ji could even tell the PM what to do: Shri Modi

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि देशातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक सुषमा स्वराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सुषमाजींनी एक नेता म्हणून देशाची मनापासून सेवा केल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील विविध पैलू अधोरेखित केले.

सुषमा स्वराज यांच्याबरोबर काम केलेल्या सर्वांना त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचे भाग लाभले

सुषमाजींच्या योगदानातून स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की आपल्याला त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचे भाग्य लाभले. सुषमाजी या बहुआयामी व्यक्तिमत्व होत्या आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे त्यांना त्या किती महान व्यक्तिमत्व होत्या हे माहीत आहे.

कोणतेही आव्हान स्विकारायला सुषमा स्वराज कचरल्या नाहीत.

सुषमा स्वराज कोणतेही आव्हान स्विकारायला कचरल्या नाहीत असे पंतप्रधानांनी नमूद केले. 1999 मध्ये बेल्लरी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत पंतप्रधान म्हणाले की, मला आठवतंय की मी आणि व्यंकय्या नायडू सुषमाजींना भेटलो होतो आणि त्यांना कर्नाटकमध्ये निवडणूक लढवायला सांगितले होते. याचा निकाल निश्चित होता मात्र, कोणतीही आव्हानं स्विकारायला त्या नेहमीच सज्ज असायच्या.

सुषमा स्वराज या उत्तम वक्त्या होत्या आणि त्यांची भाषणं प्रभावी तसेच प्रेरणादायीही असायची असे पंतप्रधान म्हणाले.

सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रोटोकॉलपेक्षा जनतेशी जोडले

मंत्रीपदाची कोणतीही जबाबदारी पार पाडतांना सुषमा स्वराज यांनी उल्लेखनीय बदल घडवून आणला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पारंपरिकपणे प्रोटोकॉलशी जोडलेले असते मात्र सुषमाजींनी एक पाऊल पुढे जात ते नागरिकस्नेही बनवले, असे पंतप्रधान म्हणाले.

सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाच्या कार्यकाळात पारपत्र कार्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ

सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पारपत्र कार्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

हरियाणीबाणा

सुषमा स्वराज यांच्याबाबत खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट सांगताना पंतप्रधानांनी त्यांच्या हरियाणी बोलीभाषेबद्दल सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, आपण लोकांना राजकीयदृष्ट्या बरोबर गोष्टी सांगतो मात्र सुषमाजी वेगळ्या होत्या. आपल्या मनातलं ठामपणे मांडण्यासाठी त्या मागेपुढे पाहात नव्हत्या, हे त्यांचे वैशिष्टय होते.

सुषमा स्वराज पंतप्रधानांना देखील काय करायचे हे सुचवत होत्या

याबाबतचा एक प्रसंग सांगताना पंतप्रधान म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रथमच भाषण देण्यापूर्वी सुषमा स्वराज यांनी त्यांना काय बोलायचे याबाबत मार्गदर्शन केले होते. संयुक्त राष्ट्रासाठी केवळ एका रात्रीत भाषणाची तयारी करून देण्यात सुषमाजींनी मदत केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

बासुरीमध्ये सुषमा स्वराज यांची छबी दिसते-पंतप्रधान

सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी यांच्यात सुषमाजींची छबी दिसते असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल आणि कन्या बासुरी यांच्याशी त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

या प्रार्थना सभेला अवधेशानंद गिरीमहाराज, माजी मंत्री दिनेश त्रिवेदी, खासदार पीनाकी मिश्रा, मंत्री रामविलास पासवान, खासदार सतीशचंद्र मिश्रा, खासदार राजीव रंजन, खासदार त्रिची शिवा, खासदार ए. नवनीतकृष्णन, खासदार नम्मा नागेश्वर राव, माजी खासदार शरद यादव, मंत्री अरविंद सावंत, खासदार प्रेमचंद गुप्ता, खासदार सुखबीरसिंग बादल, खासदार अनुप्रिया पटेल, खासदार आनंद शर्मा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, डॉ. कृष्ण गोपाल आणि जे. पी. नड्डा आदी मान्यवर उपस्थित होते.

पूरा भाषण पढ़ने के लिए यहां क्लिक कीजिए

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report

Media Coverage

Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi pays tributes to the Former Prime Minister Dr. Manmohan Singh
December 27, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to the former Prime Minister, Dr. Manmohan Singh Ji at his residence, today. "India will forever remember his contribution to our nation", Prime Minister Shri Modi remarked.

The Prime Minister posted on X:

"Paid tributes to Dr. Manmohan Singh Ji at his residence. India will forever remember his contribution to our nation."