पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातच्या केवडिया येथे जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिली पुष्पांजली.
सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते.
एक भारत श्रेष्ठ भारतचे ध्येय गाठण्यासाठी संपूर्ण भारतभर ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन केले जात आहे.
पंतप्रधान म्हणाले, “सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. आमच्या देशासाठी त्यांचे योगदान हे संस्मरणीय आहे ”
ते म्हणाले की, “त्यांनी भारताला एकत्रित केले. शेतकऱ्यांचा नेता, एक महान प्रशासक आणि गरिबांच्या हक्कांची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या सरदार पटेल यांचे अतुलनीय योगदान भारत नेहमीच लक्षात ठेवेल. ”
केवडिया येथे पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त प्रतिज्ञा देखील केली.