थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांनी 06 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचा संवाद साधला. थायलंडच्या पंतप्रधानांनी भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले.
दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध यासारख्या विविध क्षेत्रात बहुआयामी आणि मजबूत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही विचार विनिमय केला.
Thank PM Srettha @Thavisin for his congratulatory call. Look forward to strengthen India-Thailand strategic partnership for the benefit of our people and the bright future of Asia. Our best wishes to Thailand for successful Presidency of BIMSTEC.
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2024