नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले. भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळासाठी मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान प्रचंड यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत- नेपाळ संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान ‘प्रचंड’ यांच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले. नेपाळच्या पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दिलेल्या भारत भेटीची प्रेमळपणे आठवण काढून पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की त्या भेटीदरम्यान या नेत्यांनी दोन्ही देशांदरम्यान असलेली पारंपरिक, मैत्रीपूर्ण आणि बहुआयामी भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते.
भारताचे नेपाळशी खोलवर रुजलेले सांस्कृतिक तसेच नागरी सभ्यता विषयक संबंध आहेत आणि शेजारी देशांना प्राधान्य या भारताच्या धोरणात नेपाळ नेहमीच विशेष भागीदार आहे. दूरध्वनीवरून आज झालेले संभाषण दोन्ही देशांमध्ये असलेल्या उच्च स्तरीय देवाणघेवाणीची परंपरा सुरु ठेवणारे होते.
Happy to speak with PM @cmprachanda. Thanked him for his warm wishes. We reaffirmed our shared commitment to bolster the deep-rooted and multifaceted partnership between India and Nepal, and agreed to sustain the positive momentum in our relations.
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2024