जमेकाचे पंतप्रधान अँड्रयु मायकेल होलनेस यांनी दूरध्वनीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छांबद्दल होलनेस यांचे आभार मानले. जमेका आणि संपूर्ण कॅरिबियन प्रांताबरोबरच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देईल, यावर त्यांनी भर दिला. या प्रांताबरोबरच्या दृढ आर्थिक सहकार्यामुळे या वर्षी कॅरिकॉम विकास निधीचा आंतरराष्ट्रीय विकास भागीदार बनण्याचा भारताने निर्णय घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जमेका आणि कॅरिबियन बरोबरच्या संबंधांवर भारताचा भर असल्याचे पंतप्रधान होलनेस यांनी स्वागत केले. हवामान बदलाच्या आव्हानासह परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.