पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी आज दूरध्वनीवर त्यांचे अभिनंदन केले.
भारतातील लोकांप्रती असलेल्या त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपुलकीबद्दल त्यांचे आभार मानताना, पंतप्रधानांनी भारत-इस्रायल संबंधांना बळकट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. .
उभय नेत्यांनी सर्व क्षेत्रात भारत-इस्रायल सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
संपर्कात राहण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.