आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पशिन्यान यांचे आभार मानले आणि उभय देशांमधील सर्व क्षेत्रातील वाढते सहकार्य नमूद केले.
दोन्ही नेत्यांनी भारत-आर्मेनिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
परस्परांच्या संपर्कात राहण्यास त्यांनी सहमती दर्शवली.