माझे बंधू दुबईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्या निमंत्रणावरून मी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या कॉप २८ जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबईला जात आहे. हवामान बदल क्षेत्रात भारताचा निकटचा भागीदार असलेल्या दुबईच्या अध्यक्षतेखाली ही अतिशय महत्वाची परिषद होत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.
भारताने सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाठपुरावा करताना नेहमीच आपल्या नागरी सभ्यतेच्या मूल्यांना अनुसरून हवामान बदल कृतींवर भर दिला आहे.
आमच्या जी ट्वेन्टी परिषदेच्या अध्यक्षतेच्या कालखंडात हवामानाला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले. सर्व प्रमुख नेत्यांच्या नवी दिल्ली घोषणपत्रामध्ये हवामान कृती आणि शाश्वत विकास या दोन्ही गोष्टींवर अनेक ठोस उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. या विषयांवर झालेल्या सहमतीला कॉप २८ परिषद अधिक जोमाने पुढे नेईल अशी मी अपेक्षा करतो.
पॅरिस करारानंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी कॉप २८ परिषदेत मिळेल तसेच हवामान बदल विषयक भविष्यकालीन रूपरेषा देखील स्पष्ट होईल. भारताने आयोजित केलेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेत, ग्लोबल साऊथने समानता, न्याय आणि समान परंतु भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्त्वांवर आधारित हवामान कृतीची गरज तसेच अनुकूलनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. विकसनशील देशांच्या प्रयत्नांना पुरेशा हवामान निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचा पाठिंबा असणे महत्वाचे आहे. शाश्वत विकास साधण्यासाठी त्यांच्याकडे न्याय्य कार्बन उत्सर्जनाचा अधिकार आणि विकासाकरता अनुकूल वातावरण असणे आवश्यक आहे.
हवामान बदलाच्या क्षेत्रात भारताने बोलल्याप्रमाणे कृती केली आहे. नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, वनीकरण, ऊर्जा संवर्धन, मिशन LiFE यांसारख्या विविध क्षेत्रातील आमची कामगिरी वसुंधरेसाठी आमच्या नागरिकांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
मी हवामान निधी , ग्रीन क्रेडिट उपक्रम आणि लीड आयटी यासह विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागीहोण्यास उत्सुक आहे
मी दुबई इथे उपस्थित असलेल्या इतर काही नेत्यांना भेटण्याची आणि जागतिक हवामान कृतीला गती देण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी संधीची वाट पाहत आहे.