पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 ऑगस्ट 2024 दरम्यान पोलंडला भेट देणार आहेत. गेल्या 45 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिली भेट असेल.
पोलंडला आगमन झाल्यानंतर पंतप्रधानांचे वॉर्सा येथे औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर ते पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज सेबॅस्टियन डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. याशिवाय पंतप्रधान पोलंड मधील भारतीय समुदायाशी संवाद साधतील.
त्यानंतर पंतप्रधान युक्रेनसाठी प्रस्थान करतील. युक्रेन आणि भारत या दोन देशांमध्ये 1992 मध्ये निर्माण झालेल्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच युक्रेन भेट असेल.
पंतप्रधानांच्या या कीव भेटीदरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय, व्यापार, आर्थिक, गुंतवणूक, शिक्षण, सांस्कृतिक, नागरिकांचे आदानप्रदान, मानवतावादी सहाय्य आणि इतर द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंना स्पर्श करतील. या दौऱ्यात पंतप्रधान विद्यार्थ्यांसह भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. पंतप्रधानांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांचा अधिक विस्तार व्हायला मदत होईल.