Quoteवैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी गुंतवणूकीला चालना
Quoteमुलांसाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर
Quoteशेतकरी, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणार्‍या व्यक्तींसाठी अनेक उपक्रम
Quoteया उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना चालना मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईलः पंतप्रधान
Quoteया उपाययोजनामुळे सुधारणा सुरु ठेवण्याबाबत आमच्या सरकारची वचनबद्धता दिसून येते पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी म्हणाले  की आज अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना  चालना मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल. लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य सुविधा, शेतकरी, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती यासाठी केलेल्या उपाययोजना त्यांनी अधोरेखित केल्या.

ट्वीटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले.

“अर्थमंत्र्यांनी  जाहीर केलेल्या उपायांमुळे सार्वजनिक आरोग्य सुविधा, विशेषत: कमी प्रमाणात सेवा असलेल्या भागात, वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी गुंतवणूकीला चालना मिळेल आणि महत्वपूर्ण  मनुष्यबळात वाढ होईल. आपल्या मुलांसाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

आपल्या  शेतकऱ्यांना मदत करण्याला महत्त्व दिले गेले आहे. बहुविध  उपक्रमांची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांचे खर्च कमी होतील, त्यांचे उत्पन्न वाढेल  आणि कृषी उपक्रमांना अधिक लवचीकपणा आणि स्थायित्व देण्यात समर्थन मिळेल.

आपल्या  छोट्या उद्योजकांना आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आणि पुढे त्यांचा विस्तार करण्यास सक्षम बनवण्यासाठी  आणखी मदत जाहीर केली आहे. पर्यटनाशी निगडित असलेल्यांसाठी आर्थिक मदतीसह अनेक उपक्रम जाहीर केले  आहेत.

या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना प्रोत्साहन  मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल. परिणाम संलग्न  उर्जा वितरण योजना आणि पीपीपी प्रकल्प आणि मालमत्तेतून महसूल प्रक्रिया सुरळीत करण्यातून  आमच्या सरकारची सुधारणांप्रति  वचनबद्धता दिसून येते."

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Is Positioned To Lead New World Order Under PM Modi

Media Coverage

India Is Positioned To Lead New World Order Under PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi pays tribute to Swami Ramakrishna Paramhansa on his Jayanti
February 18, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Swami Ramakrishna Paramhansa on his Jayanti.

In a post on X, the Prime Minister said;

“सभी देशवासियों की ओर से स्वामी रामकृष्ण परमहंस जी को उनकी जयंती पर शत-शत नमन।”