पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान महामहिम बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
29 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथील इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान नेतान्याहू यांना आश्वासन दिले की इस्रायली राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेला भारत सर्वाधिक महत्त्व देतो आणि दोषींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करेल. या संदर्भात दोन्ही नेत्यांनी भारतीय आणि इस्त्रायली सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाबद्दल समाधान व्यक्त केले.
उभय नेत्यांनी आपापल्या देशांमध्ये कोविड -19 महामारी विरूद्ध लढ्याच्या प्रगतीबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि या क्षेत्रात अधिक सहकार्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली.