महामहीम, चॅन्सलर कार्ल नेहमर,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांचे सदस्य,
नमस्कार ,
सर्वप्रथम, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी चॅन्सलर नेहमर यांचे आभार मानतो. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझी ही भेट ऐतिहासिक आणि खास आहे. एकेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असताना ही भेट होत आहे, हा देखील एक सुखद योगायोग आहे.
मित्रहो,
लोकशाही आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरील आमचा सामायिक विश्वास आमच्या नातेसंबंधाचा मजबूत पाया आहे. परस्पर विश्वास आणि सामायिक हित आमचे संबंध मजबूत करतात. आज, चॅन्सलर नेहमर आणि माझी खूप अर्थपूर्ण चर्चा झाली. आमचे सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही नवीन संधींची चाचपणी केली. आम्ही आमच्या संबंधांना धोरणात्मक दिशा देण्याचे ठरवले आहे. आगामी दशकांतील सहकार्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे केवळ आर्थिक सहकार्य आणि गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही. पायाभूत सुविधांचा विकास, नवोन्मेष , नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये आम्ही एकमेकांचे सामर्थ्य जोडण्याचे काम करू.
दोन्ही देशांची युवाशक्ती आणि कल्पना यांची सांगड घालण्यासाठी स्टार्ट-अप सेतूला गती दिली जाईल. गतिशीलता आणि स्थलांतरण भागीदारीबाबत करार आधीच झाला आहे. यामुळे कायदेशीर स्थलांतर आणि कुशल मनुष्यबळाची वाहतूक सुलभ होतील. सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांमधील देवाणघेवाणीला चालना दिली जाईल.
मित्रहो,
आपण ज्या सभागृहात उभे आहोत ते सभागृह अतिशय ऐतिहासिक आहे. 19 व्या शतकात येथे ऐतिहासिक व्हिएन्ना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ती परिषद युरोपमधील शांतता आणि स्थैर्यासाठी दिशादर्शक ठरली. युक्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती असो, जगभर सुरू असलेल्या संघर्षांवर चॅन्सलर नेहमर आणि मी सविस्तर चर्चा केली आहे. मी आधीही म्हटले आहे की ही युद्धाची वेळ नाही. युद्धभूमीवर समस्या सोडवता येत नाहीत. निष्पाप जीवांची हानी, कुठेही, अस्वीकार्य आहे. शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरीवर भारत आणि ऑस्ट्रियाचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही दोघेही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.
मित्रहो,
आज,आम्ही हवामान बदल आणि दहशतवाद यासारख्या मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांवर आमचे विचारही शेअर केले. हवामानाच्या संदर्भात, आम्ही ऑस्ट्रियाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती आणि जैवइंधन आघाडी यासारख्या आपल्या उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. आम्ही दोघेही दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. तो कोणत्याही स्वरूपात अस्वीकार्य आहे आणि कोणत्याही प्रकारे न्याय्य ठरू शकत नाही याबाबत आम्ही सहमत आहोत. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांना अधिक समकालीन आणि प्रभावी बनवण्यासाठी सुधारणांच्या गरजेवर आम्ही सहमत आहोत.
मित्रहो,
येत्या काही महिन्यांत ऑस्ट्रियामध्ये निवडणुका होणार आहेत. लोकशाहीची जननी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय जनतेच्या वतीने मी चांसलर नेहमर आणि ऑस्ट्रियाच्या जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. थोड्याच वेळात आम्ही दोन्ही देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. ऑस्ट्रियाच्या आदरणीय राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा मानही मला मिळेल. पुन्हा एकदा, मी चांसलर नेहमर यांच्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित करतो. खूप खूप धन्यवाद.
मुझे ख़ुशी है कि मेरे तीसरे कार्यकाल की शुरुआत में ही ऑस्ट्रिया आने का अवसर मिला।
— PMO India (@PMOIndia) July 10, 2024
मेरी यह यात्रा ऐतिहासिक भी है और विशेष भी।
41 साल के बाद किसी भारतीय प्रधानमंत्री ने ऑस्ट्रिया का दौरा किया है।
ये भी सुखद संयोग है कि ये यात्रा उस समय हो रही है जब हमारे आपसी संबंधों के 75 साल…
लोकतंत्र और rule of law जैसे मूल्यों में साझा विश्वास, हमारे संबंधों की मजबूत नींव हैं।
— PMO India (@PMOIndia) July 10, 2024
आपसी विश्वास और shared interests से हमारे रिश्तों को बल मिलता है: PM @narendramodi
आज मेरे और चांसलर नेहमर के बीच बहुत सार्थक बातचीत हुई।
— PMO India (@PMOIndia) July 10, 2024
हमने आपसी सहयोग को और मज़बूत करने के लिए नई संभावनाओं की पहचान की है।
हमने निर्णय लिया है कि संबंधों को स्ट्रैटेजिक दिशा प्रदान की जाएगी: PM @narendramodi
मैंने और चांसलर नेहमर ने विश्व में चल रहे विवादों, चाहे यूक्रेन में संघर्ष हो या पश्चिम एशिया की स्थिति, सभी पर विस्तार में बात की है।
— PMO India (@PMOIndia) July 10, 2024
मैंने पहले भी कहा है कि यह युद्ध का समय नहीं है: PM @narendramodi
हम दोनों आतंकवाद की कठोर निंदा करते हैं। हम सहमत हैं कि ये किसी भी रूप में स्वीकार्य नहीं है। इसको किसी तरह भी justify नहीं किया जा सकता: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 10, 2024
हम संयुक्त राष्ट्र संघ और अन्य अंतराष्ट्रीय संस्थाओं में रिफॉर्म के लिए सहमत हैं ताकि उन्हें समकालीन और effective बनाया जाये: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 10, 2024