महामहीम, चॅन्सलर कार्ल नेहमर,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमांचे सदस्य,

नमस्कार ,

सर्वप्रथम, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी चॅन्सलर नेहमर यांचे  आभार मानतो.  माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझी ही भेट ऐतिहासिक आणि खास  आहे. एकेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली आहे.  आपल्या द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असताना ही भेट होत आहे, हा देखील एक सुखद योगायोग आहे.

 

मित्रहो,

लोकशाही आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरील आमचा सामायिक विश्वास आमच्या नातेसंबंधाचा मजबूत पाया आहे. परस्पर विश्वास आणि सामायिक हित आमचे संबंध मजबूत करतात. आज, चॅन्सलर नेहमर आणि माझी खूप अर्थपूर्ण चर्चा झाली. आमचे सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही नवीन संधींची चाचपणी केली.  आम्ही आमच्या संबंधांना धोरणात्मक दिशा देण्याचे ठरवले आहे. आगामी दशकांतील सहकार्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे केवळ आर्थिक सहकार्य आणि गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही. पायाभूत सुविधांचा विकास, नवोन्मेष , नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये आम्ही एकमेकांचे सामर्थ्य जोडण्याचे काम करू.

दोन्ही देशांची युवाशक्ती आणि कल्पना यांची सांगड घालण्यासाठी स्टार्ट-अप सेतूला  गती दिली जाईल. गतिशीलता आणि स्थलांतरण भागीदारीबाबत करार आधीच झाला आहे. यामुळे कायदेशीर स्थलांतर आणि कुशल मनुष्यबळाची वाहतूक सुलभ होतील. सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांमधील देवाणघेवाणीला चालना दिली जाईल.

मित्रहो,

आपण ज्या सभागृहात उभे आहोत ते सभागृह अतिशय ऐतिहासिक आहे. 19 व्या शतकात येथे ऐतिहासिक व्हिएन्ना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ती परिषद युरोपमधील शांतता आणि स्थैर्यासाठी दिशादर्शक ठरली. युक्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती असो, जगभर सुरू असलेल्या संघर्षांवर चॅन्सलर नेहमर आणि मी सविस्तर चर्चा केली आहे. मी आधीही म्हटले आहे की ही युद्धाची वेळ नाही. युद्धभूमीवर समस्या सोडवता येत नाहीत. निष्पाप जीवांची हानी, कुठेही, अस्वीकार्य आहे. शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरीवर भारत आणि ऑस्ट्रियाचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही दोघेही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.

 

मित्रहो,

आज,आम्ही हवामान बदल आणि दहशतवाद यासारख्या मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांवर आमचे विचारही शेअर केले. हवामानाच्या संदर्भात, आम्ही ऑस्ट्रियाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती आणि जैवइंधन आघाडी यासारख्या आपल्या उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. आम्ही दोघेही दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. तो कोणत्याही स्वरूपात अस्वीकार्य आहे आणि कोणत्याही प्रकारे न्याय्य ठरू शकत नाही याबाबत आम्ही सहमत आहोत. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांना अधिक समकालीन आणि प्रभावी बनवण्यासाठी सुधारणांच्या गरजेवर आम्ही सहमत आहोत.

मित्रहो,

येत्या काही महिन्यांत ऑस्ट्रियामध्ये निवडणुका होणार आहेत. लोकशाहीची जननी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय जनतेच्या वतीने मी चांसलर नेहमर आणि ऑस्ट्रियाच्या जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. थोड्याच वेळात आम्ही दोन्ही देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. ऑस्ट्रियाच्या आदरणीय राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा मानही मला मिळेल. पुन्हा एकदा, मी चांसलर नेहमर यांच्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित करतो. खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Income inequality declining with support from Govt initiatives: Report

Media Coverage

Income inequality declining with support from Govt initiatives: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella meets Prime Minister, Shri Narendra Modi
January 06, 2025

Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi.

Shri Modi expressed his happiness to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. Both have discussed various aspects of tech, innovation and AI in the meeting.

Responding to the X post of Satya Nadella about the meeting, Shri Modi said;

“It was indeed a delight to meet you, @satyanadella! Glad to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. It was also wonderful discussing various aspects of tech, innovation and AI in our meeting.”