पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिडनी येथे स्वतंत्र बैठकांमध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश होता:
- भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते तसेच कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आणि अध्यक्ष प्रा.ब्रायन पी. श्मिट,
- व्यापारविषयक तज्ञ आणि मानवतावादी समस्यांबाबत भाष्य करणारे मान्यवर वक्ते मार्क बल्ला
- आदिवासी कलेचे सादरीकरण करणाऱ्या डॅनियेल मेट सुलीव्हन
- आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पाककलातज्ञ , दूरचित्रवाणीवरील निवेदिका , वक्त्या आणि उद्योजिका सारा टॉड
- सिडनी येथील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील कृत्रिम बुद्धीमत्ता संस्थेत कार्यरत मुख्य शास्त्रज्ञ प्रा.टोबी वॉल्श
- सहयोगी प्राध्यापक तसेच समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि लेखक साल्व्हातोर बाबोन्स
- ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध गायक गाय थिओडर सबॅस्टीयन
यातील प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध आणखी बळकट करण्यासाठी योगदान देण्याबाबत त्यांना प्रोत्साहित केले.