पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे पंतप्रधान महामहिम ऋषी सुनक यांची 21 मे 2023 रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी इंग्लंड-भारत मुक्त व्यापार चर्चेसह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला.
या दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि लोकांचा परस्पर सुसंवाद यासारख्या अनेक व्यापक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत एकवाक्यता अधोरेखित केली.
भारताच्या विद्यमान G-20 अध्यक्षतेबाबतही यावेळी चर्चा झाली. पंतप्रधानांनी इंग्लंडचे पंतप्रधान सुनक यांचे जी 20 परिषदेनिमित्त नवी दिल्ली इथे स्वागत करण्याबाबत उत्सुकता दर्शवली.
The meeting with PM @RishiSunak was a very fruitful one. We discussed boosting cooperation in trade, innovation, science and other such sectors. pic.twitter.com/FI9nI1gc9V
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2023