पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किशिदा यांचे आभार मानले. जपानसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना आपल्या तिसऱ्या कार्यकाळातही प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला दहा वर्षे झाल्याचे उभय नेत्यांनी नमूद केले आणि या द्विपक्षीय संबंधातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांचा शोध घेण्याबाबत तसेच  B2B आणि P2P सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली.

भारत आणि जपान अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करत असून ऐतिहासिक मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा यात समावेश आहे. या प्रकल्पामुळे भारतात रहदारीच्या क्षेत्रात नवा टप्पा सुरू होईल.  2022-2027 या कालावधीत भारतात 5 ट्रिलियन येन मूल्याच्या जपानी गुंतवणूकीचे लक्ष्य असून भारत-जपान औद्योगिक स्पर्धात्मकता भागीदारीचा उद्देश आपल्या उत्पादन संबंधी सहकार्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे हा आहे. उभय पंतप्रधानांच्या भेटीने सहकार्याच्या काही विद्यमान कामांचा आढावा घेण्याची संधी उपलब्ध करून दिली.

दोन्ही नेत्यांनी आगामी भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ही चर्चा पुढे सुरू ठेवण्याबाबत उत्सुकता दर्शवली.  

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's Q3 GDP grows at 6.2%, FY25 forecast revised to 6.5%: Govt

Media Coverage

India's Q3 GDP grows at 6.2%, FY25 forecast revised to 6.5%: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 मार्च 2025
March 01, 2025

PM Modi's Efforts Accelerating India’s Growth and Recognition Globally