पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.
उभय नेत्यांनी भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला , यात 'होरायझन 2047' मार्गदर्शक आराखडा आणि हिंद-प्रशांत मार्गदर्शक आराखड्यावर प्रामुख्याने भर होता. तसेच संरक्षण, आण्विक, अंतराळ, शिक्षण, हवामान कृती, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि राष्ट्रीय संग्रहालय भागीदारी यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहकार्य आणि उभय देशांमधील जनतेतील संबंध वृद्धिंगत कारण्याबाबत चर्चा झाली. ‘मेक इन इंडिया’वर अधिक लक्ष केंद्रित करून धोरणात्मक संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.
2025 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या आगामी एआय शिखर परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या संदर्भात एकत्रितपणे काम करताना कृत्रिम बुद्धिमत्ता ,महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याबाबत देखील त्यांनी सहमती दर्शवली.
दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवरही आपली मते मांडली.स्थिर आणि समृद्ध जागतिक व्यवस्थेसाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील मजबूत आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची असल्यावर त्यांनी भर दिला आणि ती नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शवली.
आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांना शुभेच्छा दिल्या.
Had an excellent meeting with my friend President @EmmanuelMacron. This is our fourth meeting in one year, indicating the priority we accord to strong India-French ties. Our talks covered numerous subjects such as defence, security, technology, AI, Blue Economy and more. We also… pic.twitter.com/l52eHhJclL
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2024
J'ai eu une excellente réunion avec mon ami le Président @EmmanuelMacron. Il s'agit de notre quatrième rencontre en un an, ce qui indique la forte priorité que nous accordons aux liens solides entre l'Inde et la France. Nos échanges ont porté sur de nombreux sujets tels que la… pic.twitter.com/rDsy5FPCHu
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2024