अमेरिकन गुंतवणूकदार, लेखक आणि हेज फंड, ब्रिजवॉटर असोसिएट्सचे सह संस्थापक, रे डेलिओ यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
डेलिओ यांच्याशी झालेल्या चर्चेत, भारतात आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी, अनुपालने कमी करणे तसेच अनेक कायदेशीर प्रकरणातील फौजदारी कलमे काढून टाकण्यासारख्या केंद्र सरकारच्या निर्णयांची पंतप्रधानांनी माहिती दिली. डेलिओ यांनी भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले.
Met my friend, the distinguished author and investor @RayDalio. Urged him to deepen investments in India and also talked about the reform trajectory of our Government. pic.twitter.com/sgM9JSPtQn
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2023