पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमध्ये त्या देशाचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली.
पंतप्रधान म्हणाले की, मानद वरिष्ठ मंत्री गोह यांनी सिंगापूरमध्ये 'इंडिया फिव्हर'ची सुरुवात केली,आणि सिंगापूरचे पंतप्रधान असताना भारत-सिंगापूर संबंधांकडे विशेष लक्ष दिले.त्यांच्या प्रयत्नांनी दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा पाया भक्कम झाला. गोह यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्य काळात आणि त्यानंतर भारताला दिलेल्या बहुमोल पाठबळासाठी पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
भारत-सिंगापूर संबंधांमधील ताज्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी विचार मांडले, आणि परस्परांबरोबरचे द्विपक्षीय सहकार्य नव्या उंचीवर नेण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण केली.
Met Mr. Goh Chok Tong, Emeritus Senior Minister and a widely respected statesman. We had extensive discussions on ways to add momentum to the India-Singapore friendship. His experience and expertise are very valued. pic.twitter.com/ugqCUynh1T
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2024