अमेरिकेतील अनेक आघाडीचे विचारवंत आणि अभ्यासकांच्या समूहाने आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या बैठकीत पंतप्रधान आणि तज्ञांनी विविध विकासात्मक आणि भू-राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
अमृतकाळात भारतामध्ये परिवर्तन होत असताना पंतप्रधानांनी त्यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले.
या भेटीत सहभागी झालेल्या विविध विचारवंत तसेच तज्ञांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होता :
- मायकेल फ्रॉमन, परराष्ट्र संबंध परिषद सीएफआर) न्यूयॉर्क चे नियुक्त-अध्यक्ष आणि प्रतिष्ठित व्यक्ती
- डॅनियल रसेल, आशिया सोसायटी धोरण संस्था न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी विभागाचे उपाध्यक्ष
- डॉ. मॅक्स अब्राहम्स, नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन येथील राज्यशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक
- जेफ एम. स्मिथ, संचालक, एशियन स्टडीज सेंटर, हेरिटेज फाउंडेशन, डीसी
- एल्ब्रिज कोल्बी, वॉशिंग्टन डीसी स्थित 'द मॅरेथॉन इनिशिएटिव्ह'चे सह-संस्थापक
- गुरु सोवले, संस्थापक-सदस्य, संचालक (इंडो-यूएस अफेयर्स), इंडस इंटरनॅशनल रिसर्च फाउंडेशन, टेक्सास