पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टॉयकेथॉन -2021 मध्ये सहभागी झालेल्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.
गेल्या 5-6 वर्षात देशातला युवावर्ग हॅकेथोनच्या मंचाद्वारे देशातल्या महत्वाच्या आव्हानांशी जोडला गेला आहे. देशाच्या क्षमता संघटित करून त्यांना माध्यम उपलब्ध करून देणे हा यामागचा विचार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.
बालकांचा पहिला मित्र या महत्वाबरोबरच खेळण्यांच्या आणि गेमिंगच्या आर्थिक पैलूवर भर देत पंतप्रधानांनी त्याला टॉयोकोनॉमी असे संबोधले. खेळण्यांची जागतिक बाजारपेठ सुमारे 100 अब्ज डॉलर्सची आहे मात्र या बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ 1.5 टक्केच आहे. भारत जवळजवळ 80 टक्के खेळणी आयात करतो. म्हणजेच यासाठी कोट्यवधी रुपये देशाबाहेर जातात असे सांगून या परिस्थितीत बदल घडवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. गरजू लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याची क्षमता या क्षेत्राकडे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. खेळणी क्षेत्राचा स्वतःचा लघु उद्योग असून यामध्ये ग्रामीण कारागीर, दलित, गरीब आणि आदिवासी वर्ग समाविष्ट आहे. या क्षेत्रातले महिलांचे योगदान त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी स्थानिक खेळण्यांना पसंती देत त्यांचा प्रचार करायला हवा अर्थात व्होकल फॉर लोकल चा आग्रह धरायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक स्तरावर भारतीय खेळणी स्पर्धात्मक रहावीत याकरिता कल्पकता आणि वित्त पुरवठा यासाठी नवे मॉडेल आणण्याचे आवाहन त्यांनी केले. नव कल्पना रुजवायला हव्यात, नव्या स्टार्ट अप्सना प्रोत्साहन, पारंपारिक खेळणी तयार करणाऱ्यांकडे नवे तंत्रज्ञान पोहोचवणे आणि नवी मागणी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. टॉयकेथॉन सारख्या कार्यक्रमामागे हाच विचार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
स्वस्त डाटा आणि इंटरनेटची व्यापकता वाढल्यामुळे ग्रामीण कनेक्टीव्हिटी वाढली असून भारतात आभासी, डिजिटल आणि ऑनलाईन गेमिंगच्या शक्यतांचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बाजारात उपलब्ध असणारे बरेचसे ऑनलाईन आणि डिजिटल गेम भारतीय संकल्पनांवर आधारी नसतात याबद्दल खंत व्यक्त करत यापाकी बरेच गेम हिंसा आणि मानसिक तणावाला निमंत्रण देत असल्याचे ते म्हणाले. भारताच्या क्षमता, कला आणि संस्कृती आणि समाज याविषयी जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचे सांगून यामध्ये खेळणी क्षेत्र मोठी भूमिका बजावू शकते असे पंतप्रधान म्हणाले. डिजिटल गेमिंग साठी भारताकडे मोठा आशय आणि क्षमता आहे. भारताच्या क्षमता आणि कल्पना यांचे यथार्थ दर्शन जगाला घडवण्यासाठी युवा नवोन्मेशी आणि स्टार्ट अप्सनी आपली जबाबदारी जाणावी असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ही खेळणी उद्योगामधल्या कारागीर आणि नवोन्मेशी यांच्यासाठी मोठी संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपले स्वातंत्र्य सैनिक, शोर्य आणि नेतृत्वाचे अनेक प्रसंग गेमिंगसाठी संकल्पना निर्माण करू शकतात. या नवोन्मेशीची जनतेला भविष्याशी जोडण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. मनोरंजन आणि शिक्षण यांचा संगम असणारे मनोरंजक गेम निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
बीते 5-6 वर्षों में हैकाथॉन को देश की समस्याओं के समाधान का एक बड़ा प्लेटफॉर्म बनाया गया है।
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
इसके पीछे की सोच है- देश के सामर्थ्य को संगठित करना, उसे एक माध्यम देना।
कोशिश ये है कि देश की चुनौतियों और समाधान से हमारे नौजवान का सीधा कनेक्ट हो: PM @narendramodi
बच्चे की पहली पाठशाला अगर परिवार होता है तो, पहली किताब और पहले दोस्त, ये खिलौने ही होते हैं।
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
समाज के साथ बच्चे का पहला संवाद इन्हीं खिलौनों के माध्यम से होता है: PM @narendramodi
खिलौनों से जुड़ा एक और बहुत बड़ा पक्ष है, जिसे हर एक को जानने की जरूरत है।
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
ये है Toys और Gaming की दुनिया की अर्थव्यवस्था- Toyconomy: PM @narendramodi
Global Toy Market करीब 100 बिलियन डॉलर का है।
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
इसमें भारत की हिस्सेदारी सिर्फ डेढ़ बिलियन डॉलर के आसपास ही है।
आज हम अपनी आवश्यकता के भी लगभग 80 प्रतिशत खिलौने आयात करते हैं।
यानि इन पर देश का करोड़ों रुपए बाहर जा रहा है।
इस स्थिति को बदलना बहुत ज़रूरी है: PM @narendramodi
जितने भी ऑनलाइन या डिजिटल गेम्स आज मार्केट में उपलब्ध हैं, उनमें से अधिकतर का कॉन्सेप्ट भारतीय नहीं है।
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
आप भी जानते हैं कि इसमें अनेक गेम्स के कॉन्सेप्ट या तो Violence को प्रमोट करते हैं या फिर Mental Stress का कारण बनते हैं: PM @narendramodi
भारत के वर्तमान सामर्थ्य को, भारत की कला-संस्कृति को, भारत के समाज को आज दुनिया ज्यादा बेहतर तरीके से समझना चाहती है।
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
इसमें हमारी Toys और Gaming Industry बहुत बड़ी भूमिका निभा सकती है: PM @narendramodi