गेल्या 6 वर्षांत तमिळनाडूमध्ये 50,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे तेल आणि वायू प्रकल्प उभारण्यास मंजुरी- पंतप्रधान
मध्यमवर्गाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल आमचे सरकार संवेदनशील- पंतप्रधान
पाच वर्षांच्या काळात तेल आणि वायू विषयक पायाभूत सुविधांवर साडेसात लाख कोटींचा खर्च करण्याचे आमचे नियोजन- पंतप्रधान

वणक्कम!

तामिळनाडूचे राज्यपाल, श्री बनवारीलाल पुरोहित जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री पलानीस्वामी जी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान जी, उपस्थित मान्यवर आणि बंधू-भगिनींनो

वणक्कम!

आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. आपण सगळे आज इथे अत्यंत महत्वाच्या अशा तेल आणि वायू प्रकल्पाचा शुभारंभ करण्यासाठी जमलो आहोत. हे प्रकल्प केवळ तामिळनाडूसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठीही महत्वाचे आहेत.

मित्रांनो,

मला सुरुवातीलाच दोन तथ्ये तुमच्यासमोर मांडायची आहेत, जी तुम्हालाही विचारप्रवृत्त करतील. देशातील मागणीनुसार, गरजा भागवण्यासाठी वर्ष 2019-20 मध्ये भारताने 85 टक्के तेल आणि 53 टक्के वायू आयात केला. भारतासारख्या विविधांगी आणि विविध गुणांनी समृद्ध असलेल्या देशाने ऊर्जेच्या क्षेत्रात इतके परावलंबी असणे योग्य आहे का? मला कोणावरच टीका करायची नाही, मात्र एक स्पष्ट शब्दात सांगायचे आहे: जर आपण या विषयांकडे फार आधीच लक्ष दिले असते, तर आपल्या मध्यमवर्गावर आज इंधनदराचा असा भार पडला नसता.

आता, स्वच्छ आणि हरित उर्जा स्त्रोतांसाठी काम करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ऊर्जेवरील परावलंबित्व कमी करणे. आमचे सरकार मध्यमवर्गाच्या चिंतांविषयी अत्यंत संवेदनशील आहे. म्हणूनच भारताने आता-शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभ व्हावा, म्हणून आपले लक्ष इथेनॉल निर्मितीवर केंद्रित केले आहे.

त्यासोबतच, सौरऊर्जेचा वापर वाढवत, या क्षेत्राचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारत अग्रेसर होत आहे. लोकांची उत्पादन क्षमता वाढवून, त्यांचे जीवनमान सुखकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीला प्रोत्साहन दिले जात आहे. एलसीडी बल्ब सारख्या पर्यावरणपूरक आणि स्वस्त उर्जास्त्रोतांचा वापर करून मध्यमवर्गीय घरांमध्ये वीजबिल कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आता लाखो लोकांना मदत व्हावी, या हेतूने भारत सरकारने स्क्रैपेज भंगार विषयक धोरण आणले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये आज मेट्रो सेवा सुरु होते आहे. सौर पंप अधिक लोकप्रिय होत असून, शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो आहे. लोकांच्या सहभागाशिवाय हे सगळे शक्य झाले नसते. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासातही केंद्र सरकार सातत्याने पर्यटन करत आहे. त्याचवेळी आपल्या आयात स्त्रोतांमधेही विविधता आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

मित्रांनो,

आम्ही हे कसे करतो आहोत? क्षमता बांधणीच्या माध्यमातून. वर्ष 2019-20 मध्ये आम्ही तेलशुद्धीकरण क्षमतेत जगात, चौथ्या क्रमांकावर होतो. आपण 65.2 दशलक्ष पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली आहे. हा आकडा पुढेही वाढण्याची शक्यता आहे. परदेशातील उत्तम दर्जाच्या तेल आणि वायू कंपन्या अधिग्रहित करण्यासाठी आपल्या देशातील कंपन्या प्रयत्न करत आहेत. आज, भारतीय ऑईल आणि गॅस कंपन्या 27 देशांमध्ये अस्तित्वात आहेत. त्यांनी सुमारे 2 लाख 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मित्रांनो,

“एक देश, एक गॅस ग्रिड” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही गॅस पाईपलाईन नेटवर्क विकसित करत आहोत.येत्या पाच वर्षात देशात तेल आणि वायू पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी साडे सात लाख कोटी रुपये खर्च करण्याची आमची योजना आहे. 407 जिल्ह्यात शहर गॅस वितरणाचे जाळे विस्तारण्यावर आम्ही विशेष भर दिला आहे.

मित्रांनो,

आमच्या ग्राहककेन्द्री योजना, जसे की पहल, आणि पीएम कुसुम योजनेमुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला हा गॅस मिळण्यासाठी मदत होते आहे. तामिळनाडू येथील 95% एलपीजी ग्राहक पहल योजनेचा भाग झाले आहेत. 90% पेक्षा अधिक ग्राहकांना त्यांच्या अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होते आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत, तामिळनाडू मधील दारिद्य्ररेषेखालील 32 लाख कुटुंबांना नव्य गॅस जोडण्या मिळाल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 31.6 लाख घरांना मोफत गॅस सिलेंडर्स मिळाले आहेत.

मित्रांनो,

आज सुरु होत असलेली इंडियन ऑईलची रामनाथपूरम पासून तूतिकोरीन पर्यंतची 143 किलोमीटर लांब नसर्गिक वायू पाईपलाईन ओएनजीसी च्या गॅस प्रकल्पावरून येणारा गैस वापरणार आहे. 4,500 कोटी रुपये खर्च करुन विकसित केल्या जात असलेल्या मोठ्या नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्पाचा हा एक भाग आहे.

या पाईपलाईनचा लाभ, एन्नौर, थिरुवल्लूर, बेंगळूरु, पुद्दुचेरी, नागपट्टिणम, मदुराई आणि तूतिकोरिन या भागांना मिळेल. शहर गॅस प्रकल्पांच्या विकासालाही या पाइपलाइन मुळे हातभार लागेल. तामिळनाडूच्या 10 जिल्ह्यात 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे प्रकल्प विकसित केले जात आहेत.

या प्रकल्पांमुळे घरात स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध होईल, तसेच पीएनजी आणि सीनजी च्या रूपाने, वाहने आणि स्थानिक उद्योगांसाठी पर्यायी वाहतूक इंधन देखील उपलब्ध केले जाईल.

ओएनजीसी फील्डमधून आता हा नैसर्गिक वायू दक्षिण पेट्रोकेमिकल इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटे- एसपीआयसी, तूतिकोरम पर्यंत पोहोचेल. ही पाईपलाईन खते तयार करण्यासाठी एसपीआयसीला कमी किमतीत कच्चा माल म्हणून नैसर्गिक गॅस चा पुरवठा करेल.

त्यामुळे आता साठा न करताही, कच्चा मला सातत्याने उपलब्ध असेल. यामुळे उत्पादन खर्चात दरवर्षी 70 ते 95 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. यामुळे, खतनिर्मितीसाठी एकूण खर्चही कमी होईल. आमच्या उर्जा क्षमतेत गॅसचा सध्या असलेला 6.3 टक्के वाटा 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

मित्रांनो,

विकासाचे प्रकल्प येतात, तेच आपल्यासोबत अनेक लाभ घेऊन ! नागापट्टणम येथे सीपीसीएलच्या नव्या तेलशुद्धीकरण कारखान्यात सुमारे 80 टक्के कच्चा माल आणि इतर सेवा, स्वदेशी स्त्रोतांकडून उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. तेलशुद्धीकरण वाहतूक सुविधा, पुढच्या टप्प्यात पेट्रोकेमिकल उद्योगम उप आणि लघु उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देणारे ठरणार आहे. हा नवा तेल शुद्धीकरण प्रकल्प- बीएस- VI निकषांची पूर्तता करणारे एमएस आणि डिझेल तसेच मूल्यवर्धित उत्पादनाच्या स्वरूपात पॉलीप्रोपाइलीनचे उतप्दन करणारा असेल.

मित्रांनो,

आज भारतात अक्षय उर्जा स्त्रोतांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वाटा वाढतो आहे. 2030 पर्यंत, एकूण उर्जेपैकी 40 टक्के उर्जा हरित स्त्रोतांतून मिळणार आहे. आज सीपीसीएलच्या मनाली इथल्या आपल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात नव्या गॅसोलीन डिसल्फ्यूरेशन विभागाचे उद्घाटन झाले. हरित उर्जेच्या दिशेने हेही एक महत्वाचे पाऊल आहे. आता या तेलशुद्धीकरण प्रकल्पातून बीएस- VI गुणवत्तेच्या, सल्फरचे प्रमाण कमी असलेल्या पर्यावरणपूरक इंधनाचे उत्पादन होऊ शकेल.

मित्रांनो,

2014 पासून आम्ही तेल आणि वायू क्षेत्रात, संशोधन आणि उत्पादन, नैसर्गिक वायू निर्मिती, विपणन आणि वितरण या सगळ्याचा समावेश करत, अनेक सुधारणा केल्या आहेत. आम्ही गुंतवणूकदार स्नेही धोरणे राबवून परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध राज्यांमध्ये नैसर्गिक गॅस वर लागणाऱ्या विविध करांचा व्यापक परिणाम कमी करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आहोत. समान कररचनेमुळे नैसर्गिक गॅसच्या खर्चात घट होऊ शकेल आणि उद्योगांमध्ये देखील त्याचा वापर वाढेल. नैसर्गिक गैसला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मी जगाला आवाहन करु इच्छितो- या, भारतातील ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करा !

मित्रांनो,

गेल्या सहा वर्षात, तामिळनाडू इथल्या 50,000 कोटी रुपयांच्या तेल आणि वायू प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याच काळात, 2014 च्या आधी मंजूर झालेल्या 9100 पेक्षा अधिक कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यशिवाय, 4,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे प्रकल्प विचाराधीन आहेत. तामिळनाडूसाठीचे आमचे सर्व प्रकल्प, आमची सातत्यपूर्ण धोरणे आणि भारताच्या विकासासाठी उचललेल्या एकत्रित पावलांचा परिपाक आहे.

तामिळनाडू येथे उर्जा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या सर्वच हितसंबंधीयांचे माझ्याकडून अभिनंदन ! आपल्या या प्रयत्नात आपण सातत्याने यशस्वी होत राहू,असा मला पूर्ण विश्वास आहे.

धन्यवाद!

वणक्कम!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
25% of India under forest & tree cover: Government report

Media Coverage

25% of India under forest & tree cover: Government report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi