मी किंग्डम ऑफ जॉर्डनच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.
महामहिम किंग अब्दुल्ला आणि जॉर्डनच्या जनतेला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
जॉर्डन जगातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारशातील एक प्रमुख नाव आहे.
महामहिम किंग अब्दुल्ला यांच्या दूरदर्शी नेतृत्वात जॉर्डनने स्थायी आणि समावेशी विकास केला आहे.
आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे.
जगातील एका महत्वाच्या भागात, जॉर्डन एक सशक्त आवाज आणि संतुलन तसेच समावेशकतेचे जागतिक प्रतीक म्हणून उदयाला आले आहे.
ते एक मॉडल स्टेट म्हणून उदयाला आले आहे जे आपल्या शेजारील राष्ट्रांसमवेत शांततेने राहत आहे आणि स्थैर्याचे प्रतिक तसेच प्रभावी आवाज आहे.
महामहिम राजे पश्चिम आशियात शांततेला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका निभावत आहेत.
अकाबा प्रक्रियेने प्रादेशिक शांती आणि सुरक्षेवर समन्वय वाढवण्यात योगदान दिले आहे.
याप्रमाणेच 2004 मधील अम्मान संदेश सहिष्णुता, एकता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी जोरदार आवाहन होते.
2018 मध्ये नवी दिल्ली येथील महामहिम राजे यांच्या ऐतिहासिक भेटीदरम्यानही या संदेशाचा पुनरुच्चार केला होता.
त्यांनी धार्मिक विद्वानांच्या सभेत 'भविष्यात धार्मिक निष्ठेची भूमिका' या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी माझ्या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार केला होता.
भारत आणि जॉर्डन दोघांचाही संयुक्त विश्वास आहे की, शांती आणि समृद्धीसाठी समभाव आणि शांतीपूर्ण सह-अस्तित्व आवश्यक आहे.
आपण पूर्ण मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या संयुक्त प्रयत्नांमध्ये खांद्याला खांदा लावून पुढे चालू.
पुन्हा एकदा, या आनंदाच्या क्षणी मी महामहिम आणि जॉर्डनच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.
अल्फ मबरूक, अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन,
धन्यवाद।