मी किंग्डम ऑफ जॉर्डनच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.

महामहिम किंग अब्दुल्ला आणि जॉर्डनच्या जनतेला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

जॉर्डन जगातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारशातील एक प्रमुख नाव आहे.

महामहिम किंग अब्दुल्ला यांच्या दूरदर्शी नेतृत्वात जॉर्डनने स्थायी आणि समावेशी विकास केला आहे.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे.

जगातील एका महत्वाच्या भागात, जॉर्डन एक सशक्त आवाज आणि संतुलन तसेच समावेशकतेचे जागतिक प्रतीक म्हणून उदयाला आले आहे.

ते एक मॉडल स्टेट म्हणून उदयाला आले आहे जे आपल्या शेजारील राष्ट्रांसमवेत शांततेने राहत आहे आणि स्थैर्याचे प्रतिक तसेच प्रभावी आवाज आहे.

महामहिम राजे पश्चिम आशियात शांततेला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका निभावत आहेत.

अकाबा प्रक्रियेने प्रादेशिक शांती आणि सुरक्षेवर समन्वय वाढवण्यात योगदान दिले आहे.

याप्रमाणेच 2004 मधील अम्मान संदेश सहिष्णुता, एकता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी जोरदार आवाहन होते.

2018 मध्ये नवी दिल्ली येथील महामहिम राजे यांच्या ऐतिहासिक भेटीदरम्यानही या संदेशाचा पुनरुच्चार केला होता.

त्यांनी धार्मिक विद्वानांच्या सभेत 'भविष्यात धार्मिक निष्ठेची भूमिका' या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी माझ्या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार केला होता.

भारत आणि जॉर्डन दोघांचाही संयुक्त विश्वास आहे की, शांती आणि समृद्धीसाठी समभाव आणि शांतीपूर्ण सह-अस्तित्व आवश्यक आहे.

आपण पूर्ण मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या संयुक्त प्रयत्नांमध्ये खांद्याला खांदा लावून पुढे चालू.

पुन्हा एकदा, या आनंदाच्या क्षणी मी महामहिम आणि जॉर्डनच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.

अल्फ मबरूक, अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन,

धन्यवाद।

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदी यांनी पोर्तुगालमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला
June 24, 2017
PM Modi pays historic visit to Portugal, interacts with Indian community, highlights several aspects of India-Portugal partnership
Appreciate Portugal's participation in Yoga Day celebrations and furthering it's reach: PM Modi
India is now among the fastest growing countries in the world and is touching skies of development: PM
In the field of space, our scientists have done great work. Recently 30 nano satellites were launched: PM Modi

लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटनीयो कोस्टा यांनी संयुक्तपणे भेट दिली.

शॅम्पलीमोद फाऊंडेशन हे खाजगी जैव वैद्यक संशोधन फाऊंडेशन आहे.कर्करोगावर अत्याधुनिक उपचार विकसित करण्याबरोबरच अद्ययावत संशोधनाला इथे प्रोत्साहन दिले जाते.वैद्यक विषयक काळजी घेण्यासाठी इथे,नवा समग्र दृष्टिकोन बाळगून, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या हरित वातावरणात, संशोधन आणि उपचार यांची सांगड घातली जाते. नदी,समुद्र यांचा देखावा, बाग आणि मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या या केंद्राची रचना भारतातले नावाजलेले वास्तू रचनाकार चार्ल्स कोरेआ यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या समग्र आरोग्याच्या तत्वावर भर देतात, ते तत्व बाळगून कर्करोग संशोधन आणि उपचाराला वाहून घेतलेली ही संस्था आहे. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या वातावरणाबरोबरच रुग्णावर केमोथेरपीसह अद्ययावत उपचार केले जातात.

नेत्रविषयक संशोधनातल्या योगदानासाठी 2007 मध्ये अँटिनियो शॅम्पलीमोद पारितोषिक सुरु करण्यात आले. अरविंद आय केअर सिस्टीम या भारतीय संघटनेने पहिल्या पारितोषिकाचे मानकरी ठरण्याचा मान मिळवला. 42 देशातल्या 300 संशोधकांपैकी 3 संशोधक भारताचे प्रतिनिधित्व करतात.

शॅम्पलीमोद फाऊंडेशन आणि हैदराबाद इथली प्रसाद इन्स्टिट्यूट यांच्यात परस्पर सामंजस्य असून,शॅम्पलीमोद फाउंडेशन मध्ये येणाऱ्या परदेशी रुग्णांमध्ये भारतातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

पंतप्रधानांनी फाऊंडेशनला भेट देऊन भारतीय संशोधकांसमवेत संवाद साधला.