पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या झारखंडमधील उलिहातू गावाला भेट दिली आणि त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू गावाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“मला भगवान बिरसा मुंडा यांच्या उलिहातू गावात जाऊन त्यांना आदरांजली वाहण्याचे भाग्य लाभले. या पवित्र भूमीत किती ऊर्जा भरलेली आहे, याची अनुभूती इथे आल्यावर जाणवते. या मातीचा प्रत्येक कण देशभरातल्या माझ्या कुटुंबियांना प्रेरित करत आहे."
भगवान बिरसा मुंडा जी के गांव उलिहातू में उन्हें शीश झुकाकर नमन करने का सौभाग्य प्राप्त हुआ। यहां आकर अनुभव हुआ कि इस पावन भूमि में कितनी ऊर्जा-शक्ति भरी है। इस मिट्टी का कण-कण देशभर के मेरे परिवारजनों को प्रेरित कर रहा है। pic.twitter.com/ystNxiHm13
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023