पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंदर सेरी बेगवान येथील ओमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली.
ब्रुनेईचे धार्मिक व्यवहार मंत्री पेहीन दातो उस्ताज हाजी अवांग बदरुद्दीन यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. ब्रुनेईचे आरोग्य मंत्री दातो डॉ. हाजी मोहम्मद ईशाम हे देखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी भारतीय समुदायाचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.
या मशिदीचे नाव ब्रुनेईचे 28 वे सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसरे (सध्याच्या सुलतानचे पिता, ज्यांनी त्याचे बांधकामही सुरू केले होते) यांच्या नावावरून ठेवले आहे आणि 1958 मध्ये तिचे बांधकाम पूर्ण झाले.
Went to the Omar Ali Saifuddien Mosque in Brunei. pic.twitter.com/GfMRoYxTXq
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2024
Telah berkunjung ke Masjid Omar Ali Saifuddien di Brunei. pic.twitter.com/93PqqWWndB
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2024