हे बौद्ध मंदिर बाराव्या शतकात बांधण्यात आले होते. संपूर्ण बागन प्रदेशातील हे दुसरे सर्वात मोठे मंदिर आहे. भारतीय पुरातत्व विभाग या मंदिराच्या संरचनात्मक संवर्धन आणि रासायनिक परिरक्षणाचे काम करत आहे. गेल्या वर्षी झालेल्या भूकंपानंतर मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरु करण्यात आले.
पंतप्रधानांना मंदिरात सुरु असलेल्या पुर्नबांधणीच्या कामाची छायाचित्रे दाखवण्यात आली. पंतप्रधानांनी मंदिरात प्रार्थना केली आणि नंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली, या दरम्यान, पुरातत्व विभागाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना पुर्नबांधणी प्रक्रियेची माहिती दिली.
पंतप्रधानांनी त्यानंतर व्हिजिटर्स बुकमध्ये हस्ताक्षर केले आणि अनंदा मंदिराच्या पुर्नबांधणीमध्ये भारताच्या योगदानाची माहिती देणाऱ्या फलकाचे उद्घाटन केले.
भारतीय पुरातत्व विभाग आशियामधील विविध देशात महत्वपूर्ण पुर्नबांधणी आणि संवर्धन कार्य करत आहे. अनंदा मंदिराव्यतिरिक्त यामध्ये अफगाणिस्तानातील बमीयान बुद्ध पुतळा, कम्बोडियामधील अंगकोर वाट आणि टा प्रोह्म मंदिर, लाओसमधील वाट फोअू मंदिर आणि व्हिएतनाममधील माय सन मंदिराचा समावेश आहे.
Connecting with history. PM @narendramodi pays respects at Ananda Temple,the most historical and venerated temple in Bagan, Myanmar. pic.twitter.com/UGNHQgdoIJ
— Raveesh Kumar (@MEAIndia) September 6, 2017